Menu Close

भगवान राम आले, तरी ते बलात्कार थांबवू शकत नाहीत : भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह

भगवान श्रीरामांविषयी अज्ञानमूलक वक्तव्य करणारे आमदार भाजपचे आहेत, हेच भाजपला लज्जास्पद ! असे विधान करत असलेल्या आमदारांनाच प्रथम धर्मशिक्षण देण्याची आवश्यकता लक्षात येते ! – संपादक, हिंदुजागृती

बलिया (उत्तरप्रदेश) : मी दावा करतो की, भगवान राम जरी आले, तरी ते बलात्काराच्या घटनांवर नियंत्रण मिळवू शकत नाहीत, असे वक्तव्य येथील भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी केले. ते उन्नाव येथे झालेल्या एका बलात्काराच्या घटनेवरून बोलत होते.

सुरेंद्र सिंह पुढे म्हणाले की, अशा घटना रोखण्यासाठी महिला, पुरुष आणि मुले यांच्यावर संस्कार केले पाहिजेत. (बोलायचे म्हणून केवळ काहीतरी विधाने करण्याचा काय उपयोग ? उत्तरप्रदेश आणि केंद्रात भाजपचेच सरकार आहे, तर सिंह त्यांच्या पक्षाच्या सरकारला सांगून संस्कार का शिकवत नाहीत ? – संपादक, हिंदुजागृती) आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे की, मुलांना नैतिकता शिकवली पाहिजे; परंतु केवळ राज्यघटनेमुळे ते होणार नाही. एखाद्या अट्टल गुन्हेगाराला चकमकीत ठार केले जाते; मात्र बलात्कार्‍याला असे केले जात नाही. तो केवळ कारागृहात जातो.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *