Menu Close

हिंदवी परिवाराच्या वतीने १३ ते १५ जुलै या कालावधीत पन्हाळगड ते पावनखिंड मोहिमेचे आयोजन

कोल्हापूर : हिंदवी परिवार महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने १३ ते १५ जुलै या कालावधीत पन्हाळगड ते पावनखिंड मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यांना मोहिमेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी १३ जुलै या दिवशी सकाळी ७ वाजता पन्हाळगडावरील वीर शिवा काशीद यांच्या पुतळ्याजवळ उपस्थित रहावे. इतिहास अभ्यासक डॉ. शिवरत्न शेटे यांचे मोहिमेविषयी मार्गदर्शन होऊन मोहिमेस प्रारंभ होईल. पहिला मुक्काम खोतवाडी येथे होईल. १४ जुलै या दिवशी पांढरेपाणी येथे मुक्काम होईल. १५ जुलै या दिवशी स्वराज्य रक्षणार्थ प्राणांची आहुती देणार्‍या नरवीरांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन आणि डॉ. शिवरत्न शेटे यांचे मार्गदर्शन, महाप्रसाद, प्रशस्तीपत्र आणि सांगता समारंभ होईल. या मोहिमेसाठी ६०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

इच्छुकांनी श्री. अरविंद मेढे – ९८९०३०१०२२, श्री. राजेश यादव – ९७६७२९२७२७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन हिंदवी परिवार उपाध्यक्ष श्री. रामदास पाटील (८३०८४०७२७२) यांनी केले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *