भारतात देवतांवर टीका करणार्यांना केवळ तडीपार करण्याची शिक्षा एखाद्याच प्रकरणात होते अन्यथा शिक्षाच होत नाही; मात्र पाकमध्ये ईशनिंदा करणार्यांना फासावर लटकवले जाते !
भाग्यनगर : ‘टीव्ही ९’ या वृत्तवाहिनीवरील चर्चासत्राच्या वेळी रामायणाच्या संदर्भात आक्षेपार्ह विधान केल्याच्या प्रकरणी तेलुगू चित्रपटांचे समीक्षक काथी महेश यांना तेलंगण पोलिसांनी ६ मासांसाठी भाग्यनगरमधून तडीपार केले आहे. (तडीपार करणे म्हणजे गुन्हेगाराला एखाद्या भागातील गुन्हेगारी सोडून अन्यत्र गुन्हे करण्यासाठी दिलेली मोकळीकच ! अशी शिक्षा रहित करण्यासाठी केंद्रातील भाजप सरकारने प्रयत्न करायला हवेत आणि अन्य कठोर शिक्षा द्यायला हवी. – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या विधानानंतर महेश यांनी परिपूर्णानंद सरस्वती स्वामी यांच्याशी वाद घातला होता. या प्रकरणात पोलिसांनी परिपूर्णानंद सरस्वती स्वामी यांनाही स्थानबद्ध केले आहे. ते ९ जुलैला काथी महेश यांच्या विरोधात निषेध मोर्चा काढणार होते. (परिपूर्णानंद सरस्वती स्वामी यांना स्थानबद्ध करण्याचे कारण काय ? प्रत्येक व्यक्तीला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. तो नाकारणे म्हणजे राज्यघटनेचा अवमानच होय ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
या प्रकरणी बजरंग दल आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी महेश यांच्या विरोधात भाग्यनगरमध्ये पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट केली होती. त्या आधारे पोलिसांनी भारतीय दंड विधानातील २९५ अ (धार्मिक भावना दुखावणे) या अंतर्गत गुन्हा नोंदवला होता.
पोलीस महासंचालक एम्. महेंद्र रेड्डी यांनी महेश यांच्यावरील कारवाईचे समर्थन केले आहे. ते म्हणाले की, महेश यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग करत धार्मिक भावना दुखावल्या. त्यामुळेच ही कारवाई करण्यात आली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
WHAT IS HAPPENING TO THIS COUNTRY. HOW COME WE ARE KILLING OUR OWN RELEGION WITH OUR OWN HANDS