जगात पूर्वी केवळ हिंदूच आणि हिंदु संस्कृती अस्तित्वात होती, याचे उदाहरण !
महाराणीला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी प्रतिवर्षी येतात दक्षिण कोरियातील शेकडो लोक
नवी देहली : भगवान श्रीरामाची जन्मभूमी असलेल्या अयोध्येशी दक्षिण कोरियाचा अनुमाने २ सहस्र वर्षे जुना संबंध आहे. आजही शेकडो दक्षिण कोरियन जनता प्रतिवर्षी त्यांच्या दिवंगत महाराणीला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अयोध्येत येतात. दक्षिण कोरियाचे लोक अयोध्येला त्यांचे माहेर समजात.
दक्षिण कोरियाच्या एका शिष्टमंडळाने नुकतीच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आणि दक्षिण कोरियाची दिवंगत महाराणी हुर ह्वांग ओके यांचे स्मारक अयोध्येत उभारण्यासाठी प्रस्ताव ठेवला. या महाराणीला राजकुमारी सुरिरत्ना नावानेही ओळखण्यात येते.
ऐतिहासिक तथ्यांच्या आधारावर राजकुमारी सुरिरत्ना मुळात अयोध्या येथील रहाणारी होती आणि इ.स.४८ मध्ये करक क्लानचा राजा किम सुरोशी विवाह करून कोरियाला गेली होती. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण कोरियाच्या दौर्यावर गेले असतांना त्यांनीही तेथील लोकांचा अयोध्येशी असलेल्या संबंधाचा संदर्भ दिला होता. या वेळी दोन्ही देशांमध्ये राणी सूरिरत्नाच्या एका मोठ्या स्मारकाच्या उभारणीवर सहमतीही झाली होती.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात