Menu Close

केरळमधील माकप आणि त्याचे सरकार राज्यात ‘रामायण मास’ साजरा करणार

  • भाजप जे करत नाही ते नास्तिक आणि हिंदु धर्मद्वेषी माकप करत असेल, तर आश्‍चर्यच मानायला हवे ! भाजपला शह देण्यासाठी माकप हा प्रयत्न करत असेल, तर त्यांनी राममंदिराला समर्थन असल्याचे घोषित करावे !
  • माकपने केवळ रामायण मास साजरा न करता राज्यात गोहत्या आणि गोमांस भक्षण यांवरही बंदी घालून दाखवावी !

नवी देहली : मल्याळम् दिनदर्शिकेतील अंतिम मास असणार्‍या ‘करकीडक्कम’ मासात ‘रामायण मास’ आयोजित केले जाते. यावर्षी राज्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरकार आणि पक्ष यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करत आहे. रामायण मास १७ जुलै ते १६ ऑगस्ट या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. या मासामध्ये रामायणाचे पठण केल्यास गरिबी दूर होते, माणूस निरोगी रहातो, अशी प्राचीन मान्यता आहे. यामुळेच या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

१. माकपकडून २५ जुलैला रामायणावर एक संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी संस्कृत विद्वानांच्या साहाय्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांना शिक्षित करण्यात येणार आहे, तसेच पक्षाच्या प्रत्येक केंद्रात रामायणावर आधारित वर्ग चालू करण्यात येणार आहे. पक्षाची विद्यार्थी संघटना ‘स्टूडंट फेडरेशन ऑफ इंडिया’चे माजी अध्यक्ष आणि पक्षाचे राज्य समिती सदस्य शिवदासन यांना याचे दायित्व देण्यात आले आहे.

२. माकपच्या ‘संस्कृत संगम’ या संस्थेचे अभ्यासक या उपक्रमात व्याख्याने देणार आहेत.  माकपने वर्ष २०१७ मध्ये ‘संस्कृत संगम’ या संस्थेची स्थापना केली आहे.

३. नेहमीच धर्मापासून दूर रहाणार्‍या माकपकडून अशा प्रकारचे आयोजन करण्यामागे हिंदूंना खूश करून भाजपचा प्रभाव न्यून करण्याचा माकपचा प्रयत्न होत आहे, असेही म्हटले जात आहे.

४. यापूर्वी माकपने श्रीकृष्ण जयंतीच्या वेळी राज्यात फेर्‍या काढल्या होत्या. संघ गेल्या ५ दशकांपासून केरळमध्ये अशा प्रकारच्या फेर्‍यांचे आयोजन करत आहे. त्याला शह देण्यासाठी माकपने हा प्रयत्न केला होता, असे म्हटले गेले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *