- तेलंगण राष्ट्र समिती पक्षाचा मुसलमानांना खूश करण्याचा प्रयत्न !
- एम्आयएम्चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी आणि त्यांचे भाऊ अकबरूद्दीन ओवैसी सातत्याने हिंदु धर्मविरोधी विधाने करत असतांना तेलंगण सरकारने त्यांना तडीपार का केले नाही ?
भाग्यनगर : रामायण आणि प्रभु श्रीराम यांचा अवमान करणारे तेलुगू चित्रपट समीक्षक काथी महेश यांच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंदवूून त्यांना ६ मासांसाठी भाग्यनगरमधून तडीपार केले होते. त्यानंतर आता पोलिसांनी काथी महेश यांच्या विधानांना वैध मार्गाने विरोध करणारे राष्ट्रीय हिंदू सेनेचे संस्थापक परिपूर्णानंद स्वामी यांनाही तडीपार केले आहे. स्वामींकडून ९ जुलै या दिवशी काथी महेश यांच्या विरोधात येथे निषेध मोर्चा काढण्यात येणार होता. त्याला पोलिसांनी प्रथम अनुमतीही दिली होती; मात्र नंतर ती नाकारत स्वामींना स्थानबद्ध केले गेले आणि आता त्यांना थेट तडीपार करण्यात आले.
१. परिपूर्णानंद स्वामी यांनी काही मासांपूर्वी ‘राष्ट्रीय हिंदू सेने’ची स्थापना केली होती. या सेनेच्या काही सभांमध्ये त्यांनी आक्षेपार्ह विधाने केली आणि त्यामुळे येथील शांतता भंग होण्याचे कारण सांगत पोलिसांनी स्वामींना तडीपार केले आहे.
२. परिपूर्णानंद स्वामी यांच्या तडीपारीचा हिंदु जनजागृती समितीने विरोध केला आहे. समितीकडून भाग्यनगर, इंदूर (निजामाबाद), करीमनगर आणि विशाखापट्टणम् येथे जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले, तसेच प्रसिद्धीपत्रक काढून विरोध केला. याचसमवेत सामाजिक माध्यमातून परिपूर्णानंद स्वामी यांना समर्थन देण्याचे आवाहन केले.