Menu Close

बांगलादेशामध्ये अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण करून धर्मांतर

ढाका : बांगलादेशाच्या नारायणगंज जिल्ह्यामध्ये धर्मांध मुसलमानांनी अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण करून बलपूर्वक इस्लाममध्ये धर्मांतर केल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अधिवक्ता रवींद्र घोष यांनी पोलीस ठाण्यात भेट देऊन चौकशीची मागणी केली; मात्र ‘अधिवक्ता घोष तपासात अडथळा निर्माण करत आहेत’, असा आरोप तेथील अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी केला, असे वृत्त येथील ४ जुलैच्या दैनिक ‘जुगेर चिंता’ मध्ये प्रसिद्ध झाले आहे. (बांगलादेशामध्ये असुरक्षित हिंदू आणि निष्क्रीय भारत सरकार ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

१. १६ वर्षीय महाविद्यालयीन हिंदु मुलीचे १२ जूनला महाविद्यालयात धर्मांधांनी प्रवेशद्वारावर अडवून अपहरण केले आणि सुटकेसाठी पैशांची मागणी केली.

२. पीडितेच्या वडिलांनी तक्रार नोंदवण्याची विनंती केली. पोलीस उपनिरीक्षक अबुल कलम आझाद यांनी चौकशी करण्याचे आश्‍वासन दिले. आझाद यांनी सुटकेसाठी पैशांची मागणी केली; मात्र तक्रार नोंदवण्यास विलंब केला. पीडितेने स्वेच्छेने इस्लाममध्ये धर्मांतर केल्याचे प्रतिज्ञापत्र पोलिसांनी मिळवले आणि त्याची कल्पना आझाद यांनी तिच्या वडिलांना दिली. ते प्रतिज्ञापत्र बनावट असल्याचे वडिलांनी पोलिसांना सांगितले.

३. अधिवक्ता घोष यांनी सहकार्‍यांसह पोलीस ठाण्याला भेट देऊन आझाद यांच्याशी मुलीच्या अपहरण आणि धर्मांतर प्रकरणी चर्चा केली. अधिवक्ता घोष यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षकांशी भ्रमणभाषवर चौकशी केली; मात्र ते अधिवक्ता घोष यांच्यावर चिडले आणि त्यांनी अर्वाच्च भाषेचा वापर केला. अधिवक्ता घोष यांनी बांगलादेशाच्या गृहमंत्र्यांशी संपर्क साधल्यावर त्यांनी ‘या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्‍वासन दिल्याचे’ अधिवक्ता घोष यांनी सांगितले.

४.  हिंदु मुलीच्या अपहरणाचे प्रकरण आणि पोलिसांकडून मिळालेली वाईट वागणूक यांविषयी चिंता व्यक्त केली असून ‘मुलीची तातडीने सुटका करण्यात यावी, तसेच गुन्हेगारांना कठोर शिक्षा करण्यात यावी’, अशी मागणी अधिवक्ता घोष यांनी केली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *