Menu Close

आधुनिक गझनींचा मंदिरे कह्यात घेण्याचा प्रयत्न हाणून पाडू : नागेश जोशी, हिंदु जनजागृती समिती

पुणे : आधुनिक गझनी हिंदूंची मंदिरे कह्यात घेणार असतील, तर हिंदू गप्प बसणार नाहीत. शासनाने मंदिरांच्या सरकारीकरणाचा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अशी चेतावणी हिंदु जनजागृती समितीचे श्री. नागेश जोशी यांनी दिली. शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्‍चर देवस्थानाचा सरकारीकरणाचा निर्णय, तसेच कर्नाटक शासनाने हज हाऊसला क्रूरकर्मा टिपू सुलतानचे नाव देण्याचा घेतलेला निर्णय रहित करावा, या मागण्यांसाठी येथील बालगंधर्व चौकात १४ जुलै या दिवशी करण्यात आलेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात ते बोलत होते. या वेळी ७० हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते. हज हाऊसला टिपू सुलतानाचे नाव देणे म्हणजे अन्यायी मुसलमान राजवटीचे उदात्तीकरण केल्यासारखेच आहे, असेही श्री. जोशी म्हणाले.

हज हाऊसला टिपू सुलतानाचे नाव देण्याच्या नतद्रष्ट हिंदुद्वेषी सरकारच्या चुकीच्या निर्णयाला विरोधा करायला हवा, असे मत अधिवक्ता मोहनराव डोंगरे यांनी व्यक्त केले, तर मंदिरांनी निधीचा विनियोग भक्तांच्या सोयीसाठी आणि धर्मकार्यासाठी केला पाहिजे; पण सध्या तो इतर धर्मियांच्या प्रार्थनास्थळांच्या सोयीसुविधेसाठी केला जातो, हे निषेधार्ह आहे, असे मत अधिवक्ता नीलेश निढाळकर यांनी व्यक्त केले. सनातन संस्थेच्या कु. क्रांती पेटकर यांनीही मंदिरांच्या सरकारीकरणामागे देवनिधीवर डल्ला मारण्याचेच सरकारचे कारस्थान असल्याचे सांगितले.

क्षणचित्रे

१. रस्त्यावरून येणार्‍या-जाणार्‍यांनी मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात स्वयंस्फूर्तीने घोषणा दिल्या. गाडीवरून जाणार्‍या धर्मप्रेमींनी आंदोलनात घोषणा होत असतांना हात उंचावून त्याला समर्थन दिले. अनेकांनी उत्सुकतेने आंदोलनाचा विषय समजून घेतला, तसेच आंदोलनाची छायाचित्रेही काढली.

२. आंदोलनाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस उपस्थित होते.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *