हिंदुंनो, महाराष्ट्र सरकारच्या या हिंदुविरोधी निर्णयाला संघटितपणे वैध मार्गाने प्रखर विरोध करून सरकारीकरणाचा निर्णय मागे घेण्यास भाग पाडूया आणि श्री शनिदेवाची कृपा संपादन करूया ! – संपादक, हिंदुजागृती
नागपूर : महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियमान्वये शनिशिंगणापूर येथील ‘श्री शनैश्वर देवस्थान’ विश्वस्तव्यवस्था (शिंगणापूर) विधेयक २०१८’ हे १७ जुलैला विधानसभेत विधी आणि न्याय राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी मांडले. देवस्थानाचे विश्वस्तव्यवस्था पुनर्घटित करण्यासाठी आणि श्री शनैश्वर मंदिराच्या उत्तम प्रशासनासाठी आणि त्या विश्वस्तव्यवस्थेचे शासनाकडून नियंत्रण करण्यासाठी आणि त्याच्याशी संबंधित अथवा तदनुषंगिक गोष्टींसाठी तरतूद करण्यासाठी हे विधेयक मांडण्यात आले आहे. त्यामुळे श्री शनि देवस्थानाचे सरकारीकरण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अनेक मंदिरांचे सरकारीकरण झाल्यानंतर तेथील भ्रष्टाचार वाढत असल्याने भक्तांमध्ये तीव्र असंतोष खदखदत असतांना आता श्री शनि देवस्थानाचे सरकारीकरण केल्यामुळे अनेक भाविकांनी सरकारच्या विरोधी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या विधेयकावर पुढील हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधी सदस्य यांची सविस्तर चर्चा होऊन हे विधेयक अंतिम केले जाणार आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात