शिवसेनेचे आमदार श्री. उदय सामंत आणि श्री. राजन साळवी यांना दिले निवेदन
रत्नागिरी : अहमदनगर जिल्ह्यातील शिंगणापूर येथील श्री शनैश्चर देवस्थान अधिग्रहणाच्या संदर्भात करण्यात येत असलेला कायदा न करण्याविषयीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शासनाला देण्यात आले.
हे निवेदन रत्नागिरी येथे शिवसेनेचे आमदार श्री. उदय सामंत यांना देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रभाकर सुपल, श्री. पुरुषोत्तम वागळे, श्री. नीलेश शेट्ये, श्री. विजय पाध्ये आणि श्री. चंद्रशेखर गुडेकर उपस्थित होते. या वेळी आमदार श्री. सामंत यांनी ‘शासनाला याविषयी पत्र पाठवून कळवू’, असे सांगितले.
राजापूर येथे आमदार श्री. राजन साळवी यांना निवेदन देण्यात आले. या वेळी राजापूर शिवसेना शहरप्रमुख संजय पवार, हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनोद गादीकर आणि हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे श्री. महेश मयेकर उपस्थित होते.
निवेदनात करण्यात आलेल्या मागण्या
१. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती, पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, श्री तुळजापूर मंदिर, श्री सिद्धीविनायक मंदिर, श्री साई संस्थान, शिर्डी अशा शासन अधिग्रहित मंदिरात झालेल्या गैरकारभाराची सखोल चौकशी करण्यासाठी शासनाने न्यायालयीन चौकशी समिती नियुक्त करावी आणि देवस्थानातील घोटाळ्यांना उत्तरदायी असणार्यांवर तातडीने गुन्हे नोंद करून त्यांना अटक करावी. या घोटाळ्यात दोषी असणारे समितीचे पदाधिकारी आणि देवस्थान कर्मचारी यांची संपत्ती जप्त करून त्यांच्याकडून घोटाळ्यातील रक्कम वसूल करावी.
२. श्री शनैश्चर देवस्थानाचे अधिग्रहण रहित करावे.
३. शासनाच्या कह्यातील मंदिरांचे व्यवस्थापन त्या त्या मंदिरांचे मूळ विश्वस्त, धर्मगुरु, पुजारी आणि भक्त यांच्यांकडे सोपवावे.