Menu Close

शिवसेनेचे आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांना हिंदुत्वनिष्ठांकडून निवेदन

श्री शनैश्‍चर मंदिराच्या सरकारीकरणाचा निर्णय रहित करा ! : हिंदुत्वनिष्ठांची मागणी

१. शिवसेनेचे आमदार डॉ. सुजित मिणचेकर (मध्यभागी) यांना निवेदन देतांना २. श्री. राजू यादव, ३. श्री. शिवानंद स्वामी आणि ४. श्री. शरद माळी

कोल्हापूर : शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्‍चर मंदिराच्या सरकारीकरणाचा निर्णय रहित करावा आणि यापूर्वी सरकारीकरण करण्यात आलेली हिंदूंची मंदिरे पुन्हा भक्तांच्या कह्यात द्यावीत, या मागणीचे निवेदन हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने शिवसेनेचे आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांना १६ जुलैला देण्यात आले. या वेळी शिवसेनेचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. शरद माळी आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी उपस्थित होते. ‘निवेदनाचा अभ्यास करून त्यावर योग्य ती भूमिका घेऊ’, असे डॉ. मिणचेकर यांनी सांगितले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *