Menu Close

मंदिर सरकारीकरणाच्या विषयाबाबत सभागृहात योग्य ती भूमिका मांडू : आमदार सुधीर गाडगीळ

आमदार श्री. सुधीर गाडगीळ (उजवीकडे) यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्या

सांगली : आतापर्यंतचा पूर्वानुभव पहाता मंदिरांचे सरकारीकरण झाल्यावर भ्रष्टाचार होतो आणि धार्मिक विधींची हेळसांड होते हे सत्य आहे. या विषयाच्या संदर्भात सभागृहात विषय आल्यास योग्य ती भूमिका मांडू, असे आश्‍वासन भाजपचे सांगली येथील आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांनी दिले. शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्‍वर मंदिराच्या सरकारीकरणाचा निर्णय रहित करा आणि यापूर्वी सरकारीकरण करण्यात आलेली हिंदूंची मंदिरे पुन्हा भक्तांच्या कह्यात द्यावीत, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांना देण्यात आले. त्या वेळी हे आश्‍वासन त्यांनी दिले. या वेळी सौ. मधुरा तोफखाने आणि सौ. सुलभा तांबडे उपस्थित होत्या.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *