Menu Close

अलवर : ‘हिंदु शक्ती वाहिनी’कडून ‘हिंदु राष्ट्र संघटक निर्मिती कार्यशाळे’चे यशस्वी आयोजन

गोवा येथे झालेल्या ‘हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण आणि अधिवेशना’तून प्रेरणा घेत कार्यशाळेचे आयोजन !

डावीकडून १. श्री. आनंद जाखोटिया, २. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, ३. श्री. प्रेम गुप्ता आणि ४. श्री. राजन गुप्ता

अलवर (राजस्थान) : गोवा येथे जून २०१८ मध्ये झालेल्या ‘हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण आणि अधिवेशन’ यामधून प्रेरणा घेऊन राजस्थानच्या अलवर येथे १५ आणि १६ जुलै या दिवशी गोव्यातील अधिवेशनाला उपस्थित राहिलेले हिंदु शक्ती वाहिनीचे अध्यक्ष श्री. प्रेम गुप्ता यांनी कार्यशाळेचे आयोजन केले. यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विविध विषयांवर ४० कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेचे संचालन अधिवक्ता राजेश पटेल यांनी केले. या वेळी स्वरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके शिकवण्यात आली.

पत्रकार परिषदेत बोलताना सद्गुरू (डाॅ.) चारूदत्त पिंगळे

निःस्वार्थपणे धर्मकार्य करणारे कार्यकर्तेच हिंदु राष्ट्र स्थापनेचे बलस्थान ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाचे लक्ष्य घेऊन जेव्हा आपण हिंदूंचे संघटन करू, तेव्हाच हिंदूंमध्ये फूट पडणार नाही. हिंदूंनी एकत्र येऊन समस्या सोडवण्यावर चर्चा केली पाहिजे. जेव्हा एखादे संघटन मोठे होते, तेव्हा तेथे स्वार्थ आणि राजकारण यांना प्रारंभ होतो. हिंदु धर्माची परंपरा स्वार्थाची नाही, तर धर्मासाठी त्याग करण्याची आहे. दधिची ऋषि, महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या आचरणातून धर्मासाठी त्याग करण्याची शिकवण दिली. धर्मनिष्ठ हिंदु राजांनी सत्तेसाठी धर्माशी कधीही तडजोड केली नाही. वर्तमान काळात निःस्वार्थपणे धर्मकार्य करणारे कार्यकर्तेच हिंदु राष्ट्राची स्थापना करू शकतात. असे हिंदु असणारे ‘हिंदु शक्ती वाहिनी’चे कार्यकर्ते या कार्यशाळेमध्ये आहेत, त्यांना मी वंदन करतो.

हिंदु जनजागृती समितीकडून हिंदु राष्ट्रासाठी मिळालेले मार्गदर्शन अनमोल आहे ! – प्रेम गुप्ता

आम्ही सप्तम ‘अखिल भारतीय हिंदु अधिवेशना’साठी गोव्याला गेले होतो. तेथे आम्हाला ईश्‍वरीय ऊर्जा मिळाली आणि त्यामुळेच समस्या असतांनाही आम्ही ‘हनुमान ध्वज यात्रा’ काढू शकलो. हिंदु जनजागृती समितीकडून या कार्यशाळेत मिळालेल्या मार्गदर्शनाचे कोणतेही मूल्य असू शकत नाही.

वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना होईल. त्यासाठी आपल्याला केवळ काठी लावायची आहे. भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन उचलला, तसेच तो हिंदु राष्ट्राचे कार्यही करणार आहे. आज जिहादी आतंकवाद्यांच्या सर्वनाशासाठी माता श्री दुर्गादेवीला आवाहन करण्याची वेळ आली आहे. याचसमवेत हिंदु राष्ट्रासाठी आम्हाला शक्य असणारे सर्व प्रयत्न करणे आवश्यक आहे.

सैनिकांना ‘शहीद’ म्हणणे, हा त्यांचा अपमान ! – राजन गुप्ता

जिहाद करतांना मरतो, त्याला ‘शहीद’ म्हटले जाते. राष्ट्रासाठी प्राणत्याग करून वीरगती प्राप्त करणार्‍या सैनिकांना ‘शहीद’ म्हणणे, हा त्यांचा अपमान आहे. आज  कुराणमधील अशा प्रकारच्या शब्दांचा अर्थ समजून न घेता हिंदु त्यांचा उपयोग करत आहेत. याविषयी जागृती करण्याची आवश्यकता आहे.

समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया, समितीचे श्री. श्रीराम लुकतुके यांनी विविध विषयांवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

प्रदर्शन पहातांना हिंदुत्वनिष्ठ

क्षणचित्रे

१. कार्यशाळेच्या ठिकाणी लावलेले ग्रंथप्रदर्शन आणि हिंदु जनजागृती समितीचे विविध विषयांवरील फलक प्रदर्शन यांचा कार्यकर्त्यांनी लाभ घेतला.

२. कार्यशाळेच्या पहिल्याच दिवशी अलवरमध्ये पावसाला प्रारंभ झाला. कार्यकर्त्यांचा असा भाव होता की, या कार्यशाळेच्या माध्यमातून होणार्‍या धर्मकार्याला पावसाच्या रूपात देवाने आशीर्वाद दिला आहे.

३. कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी हिंदु राष्ट्राविषयी आयोजित पत्रकार परिषदेला सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांनी संबोधित केले. या वेळी श्री. प्रेम गुप्ता आणि श्री. आनंद जाखोटिया यांनीही त्या अनुषंगाने विषय मांडला.

श्री. राजन गुप्ता यांनी हिंदु जनजागृती समिती आणि सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्याविषयी काढलेले उद्गार

हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेद्वारे हिंदु राष्ट्राचे बीज रोवण्याचे कार्य हिंदु जनजागृती समिती करत आहे. या बीजाचा वटवृक्ष पुढील काळात हिंदु राष्ट्राच्या रूपामध्ये दिसून येईल. आमचे सौभाग्य आहे की, हिंदु राष्ट्र निर्माणासाठी एका ऋषीप्रमाणे पूर्ण जीवन समर्पित करणारे सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचे आपल्याला मार्गदर्शन मिळाले.

श्री. प्रेम गुप्ता यांनी हिंदु जनजागृती समितीविषयी केलेली हिंदी कविता

सोते रहो पाखंडियो, तुम सत्ता की गोदी में ।

शायद बची नहीं है ताकत, इस सत्ता की मदमस्ती में ॥

हिन्दू जनजागृति के छत्रछाया में स्वतंत्र संगठन,

आखरी सांस तक संघर्ष करेंगे हम ॥

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *