हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी घटनात्मक मार्गाने कार्य करण्याचा अधिवक्त्यांचा निर्धार !
यवतमाळ : राष्ट्र-धर्मकार्य करणार्या हिंदूंच्या मनातील कायद्यासंदर्भातील भीती दूर होऊन त्यांना कायदेविषयक मार्गदर्शन मिळावे, यासाठी यवतमाळ येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतेच अधिवक्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले.
समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर या वेळी म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यपूर्व काळापासून भारत हे हिंदु राष्ट्रच होते. वर्ष १९७६ मध्ये इंदिरा गांधी यांनी आणीबाणीच्या काळात घटनादुरुस्ती करून ‘सेक्युलर’ हा शब्द घटनेमध्ये घेतला. त्यामुळे हिंदूंची मोठ्या प्रमाणात हानी झाली. भारताला पुन्हा घटनात्मक मार्गाने ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करावे, यासाठी अधिवक्त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. या वेळी १२ अधिवक्ते उपस्थित होते. मार्गदर्शन ऐकून त्यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी घटनात्मक मार्गाने कार्य करण्याचा निर्धार केला.
वैशिष्ट्यपूर्ण
१. गोवा येथील सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या अंतर्गत अधिवक्ता अधिवेशनाला उपस्थित राहिलेले अधिवक्ता वीरेंद्र दराने यांनी स्वतः संपर्क करून बैठकीचे आयोजन केले.
२. जिल्ह्यात अधिवक्ता अधिवेशन घेण्यास १०० अधिवक्त्यांंना बोलवण्याचे सर्वांनी ठरवले.
३. माहिती अधिकाराच्या अंतर्गत कार्यशाळा घेण्यासाठी सर्वांनी सहभाग नोंदवला.