Menu Close

निझामाबाद (इंदूर, तेलंगण) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

निझामाबाद (इंदूर, तेलंगण) : येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या वेळी ‘महाराष्ट्रातील शनिशिंगणापूर देवस्थानाच्या सरकारीकरणाचा विरोध, कर्नाटकमधील हज भवनाला टिपू सुलतानचे नाव देणे आणि तेलंगणमधील ‘टीव्ही ९’ वृत्तवाहिनीच्या विरोधात कारवाई करणे’ या मागण्या करण्यात आल्या.

हिंदु जनजागृती समितीचे राज्य समन्वयक श्री. चेतन जनार्दन गाडी यांनी सांगितले की, टीव्ही ९ वृत्तवाहिनी जाणीवपूर्वक हिंदु धर्माचा अवमान करण्यासाठी ज्योतिषशास्त्र, वास्तूशास्त्र, संख्याशास्त्र आणि ग्रहण काळामध्ये सांगितल्या गेलेल्या निषिद्ध गोष्टी अंधश्रद्धा आहेत, हे सिद्ध करण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करत आहे. भगवान श्रीराम यांच्या विरोधात बोलणार्‍यांना या कार्यक्रमांमध्ये आमंत्रित करून प्रोत्साहन देत आहे. या वाहिनीवर बंदी घालून कठोर कारवाई केली पाहिजे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *