यवतमाळ : शासनाने श्री शनैश्चर देवस्थानाचे सरकारीकरण तात्काळ रहित करावे आणि मंदिर पुन्हा भक्तांच्या कह्यात द्यावे, तसेच हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणार्या क्रूरकर्मा टिपू सुलतानचे हज हाऊसला देण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने रहित करावा, या मागण्यांसाठी स्थानिक दत्त चौक येथे १५ जुलै या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला ४०० हून अधिक जिज्ञासूंनी स्वाक्षरीद्वारे पाठिंबा दर्शवला.
या वेळी युवा सेवा संघाचे श्री. गणेश साठे, गाडगेबाबा स्वच्छता भाविक बहुउद्देशीय संस्थेचे श्री. विनोद अरेवार तसेच सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीचे २५ कार्यकर्ते उपस्थित होते.
क्षणचित्रे
१. आंदोलनस्थळी आलेल्या रोहन पटेल या १६ वर्षीय मुलाचे प्रबोधन केल्यावर त्याने आपल्या गळ्यातील क्रॉस काढून समितीच्या कार्यकर्त्यांकडे दिला.
२. आंदोलनापूर्वी गेल्या ८ दिवसांपासून यवतमाळ येथे संततधार पाऊस असूनही आंदोलनाच्या वेळी पाऊस आला नाही.
३. युवा सेवा संघाचे श्री. गणेश साठे यांनी रस्त्यावरून जाणार्या लोकांचे स्वाक्षरी करण्यासाठी प्रबोधन केले.