हरन यांचे हिंदुत्वाचे कार्य पुढे नेण्याची आवश्यकता ! – मान्यवरांचे आवाहन
चेन्नई : तमिळनाडूतील दिवंगत हिंदुत्वनिष्ठ लेखक आणि पत्रकार बी.आर्. हरन यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या श्रद्धांजली कार्यक्रमात भाजपचे नेते एच्. राजा, अनेक हिंदुत्वनिष्ठ, पत्रकार, नातेवाइक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते अशा ७० जणांनी सहभाग घेतला होता.
१. ‘ब्राह्मीन टुडे’ नियतकालिकाचे संपादक एस्.एस्. वासन यांनी हरन यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. ‘हिंदुत्व जपणे, हे प्रत्येक ब्राह्मणाचे मुख्य कर्तव्य आहे,’ असा विचार हरन यांनी ठामपणे मांडला, असे वासन यांनी सांगितले. रा.स्व. संघाचे श्री. विठ्ठल नारायण आणि आकाशवाणी केंद्राचे श्री. सुदर्शन यांनी हरन यांच्याविषयी काही वैयक्तिक अनुभव सांगितले.
२. एच्. राजा यांनी हरन यांना श्रद्धांजली वाहतांना सांगितले की, हरन यांचे हिंदुत्वाविषयीचे कार्य पुढे नेण्याची आवश्यकता आहे. हिंदु धर्मावर आक्रमण करण्यासाठी सर्व राष्ट्रविरोधी शक्ती एकटवल्या आहेत. याविषयी हिंदूंमध्ये जागृती करणे आवश्यक आहे. मंदिरांचे रक्षण करणे आवश्यक आहे.
३. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सौ. सुगंधी जयकुमार यांनी हरन यांचे वर्ष २०१६ च्या गुरुपौर्णिमा कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतांनाचे काही अनुभवकथन केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याशी त्यांचा पुष्कळ जवळचा संबंध होता. रामनाथी (गोवा) येथे पार पडलेल्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचा आढावा घेणारे वृत्त त्यांनी ‘हिंदु मित्र’ या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध केले होते.
क्षणचित्र : या वेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी गुरुपौर्णिमेविषयीचे विशेषांक उपस्थित हिंदुत्वनिष्ठांना दिले. अनेकांनी गुरुपौर्णिमा कार्यक्रमात उपस्थित रहाणार असल्याचे सांगितले.