- राज्यात भाजपचे सरकार असतांना ख्रिस्त्यांचे असे धाडस होतेच कसे ? असे होणे, हे भाजपला लज्जास्पद !
- यावरून राज्यात धर्मांतरविरोधी कायद्याची आवश्यकता किती आहे, हेच दिसून येते !
- सहस्त्रो जणांचे धर्मांतर होईपर्यंत कुणाला लक्षात न येणे, हे हिंदूंच्या आत्मकेंद्रित वृत्तीचे फलित आहे !
उल्हासनगर (जिल्हा ठाणे) : येथील उद्यमशील सिंधी समाजातील काही गरजूंना हाताशी धरून पैशांसह इतर आमिषे दाखवून हिंदु धर्मातील अनुमाने १ सहस्र सिंधी कुटुंबियांचे, म्हणजेच ५ सहस्रांहून अधिक सिंधींचे ख्रिस्ती धर्मात धर्मांतर झाल्याचे समोर येत आहे. हा प्रकार रोखण्यासाठी उल्हासनगर येथे ‘सिंधी जागरूक मंचाची’ स्थापना करण्यात आली आहे. (धर्मांतराचे षड्यंत्र लक्षात घेऊन ते थांबवण्याचा प्रयत्न करणार्या ‘सिंधी जागरूक मंचा’चे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) १६ जुलैपासून सिंधी समाजाचे उपवासाचे ‘चालिया पर्व’ चालू झाले. या पर्वात मंदिरात मेणबत्ती न लावता तुपाचा दिवा लावण्याचे आवाहन मंचाने केले आहे.
हिंदु धर्मातील आदिवासींचे अज्ञान आणि अशिक्षितणा यांचा अपलाभ घेत त्यांचे धर्मांतर करण्याचे कुभांड उघड झाल्याने ख्रिस्ती धर्मप्रचारकांनी आता शहराकडे त्यांचा मोर्चा वळवला आहे. आता ख्रिस्ती चर्च वगैरे न उभारता घराघरांत जाऊन मेणबत्त्या आणि क्रॉस देऊन आणि प्रार्थना घेऊन त्यांचे धर्मांतराचे षड्यंत्र कार्यवाहीत आणत आहेत, असे समजते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात