मलकापूर : येथील वाचक आणि धर्मप्रेमी यांना साधनेची दिशा मिळावी म्हणून सनातन संस्थेच्या वतीने १७ जुलै या दिवशी श्रीराम मंदिर या ठिकाणी साधनावृद्धी शिबीर घेण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी ‘साधनेचे महत्त्व’ या विषयावर, तर सनातन संस्थेच्या आधुनिक वैद्या (सौ.) शिल्पा कोठावळे यांनी ‘स्वभावदोष आणि अहंनिर्मूलन’ या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रसाद कुलकर्णी यांनी केले. या शिबिराचा लाभ ५५ धर्मप्रेमी आणि वाचक यांनी घेतला.
या वेळी डॉ. भरत पाटील, शाहीर संघटना अध्यक्ष श्री. दगडू पाटील, शाहूवाडी येथील सरपंच सौ. वैशाली लाळे, सौ. पूनम मिरजे, माजी सरपंच श्री. मोहन चिरमुरे, ग्रामपंचायत सदस्य श्री. भरत पाटील, निवृत्त शिक्षक श्री. सुरेश पोतदार, सर्वश्री रामचंद्र घोडके, प्रविण बर्डे, मानसिंग देसाई, रोहन भोगटे, सौ. शुभांगी घोडके आदी उपस्थित होते.
क्षणचित्रे
१. ‘साधनावृद्धी शिबिरासाठी शाहूवाडी या ठिकाणी शिबीर आयोजित करा’, अशी मागणी सरपंच सौ. वैशाली लाळे यांनी केली.
२. ‘या शिबिरात येऊन पुष्कळ शिकायला मिळाले आणि पुष्कळ छान वाटले’, असे धर्मशिक्षण वर्गातील सौ. सुजाता चव्हाण यांनी सांगितले.
३. एक धर्मप्रेमी श्री. दगडू पाटील यांनी शिबिरानंतर स्वत:हून दूरभाष करून स्वभावदोष निर्मूलनाविषयी अधिक जाणून घेतले.
४. एका शिबिरार्थींनी रविवारचे दैनिक सनातन प्रभात चालू केले.
५. असेच शिबीर प्रत्येक मासांत घ्या, अशी मागणी उपस्थितांनीही केली.