तळोजा (पनवेल) येथे कार्यशाळेचे आयोजन !
पनवेल : भारतातील बहुतांश कायदे हे हिंदुविरोधी आहेत; परंतु माहिती अधिकार कायद्याचा प्रभावी उपयोग केला, तर हिंदूंच्या विरोधातील कारस्थाने दूर करणे सोपे जाईल. हा कायदा म्हणजे हिंदूंसाठी शस्त्र आहे, असे मार्गदर्शन १५ जुलै या दिवशी तळोजा येथील कै. कमळू पाटील विद्यालयात पार पडलेल्या कार्यशाळेत श्री. विक्रम भावे यांनी केले. स्वराज्य मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. गुरुनाथ मुंबईकर यांच्या पुढाकाराने हे आयोजन करण्यात आले. २१ धर्माभिमान्यांनी याचा लाभ घेतला. या कार्यशाळेत गुरुकृपायोगानुसार साधनेचे महत्त्व, हिंदु रक्षणाचे कार्य करतांना गुणसंवर्धन कसे करावे, कायद्याची माहिती आणि सेक्युलर लोकशाही आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र, असे विविध विषय घेण्यात आले.
स्वराज्य मिळवण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही ! – नरेंद्र सुर्वे, प्रवक्ते हिंदु जनजागृती समिती
हिंदु स्वयम् अर्थाने पंथनिरपेक्ष आहेत. पर्शियन जेव्हा भारतात, आले तेव्हा येथील हिंदूंनी त्यांना स्वीकारले. यामध्येच रतन टाटांसारखे मोठे उद्योगपती झाले; परंतु हिंदूंना सतत जातीयवादी म्हणून हिणवले जाते. सेक्युलॅरिझम ही युरोपियन संस्कृती हिंदूंवर इंग्रजाळलेल्या राज्यकर्त्यांनी लादली. गेल्या ७० वर्षांत या कारणामुळेच भारत अधोगतीला गेला. स्वराज्य मिळवण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करून पुन्हा एकदा भारताला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण संघटित होऊ या !
हिंदु जनजागृती समितीचे श्री. बळवंत पाठक म्हणाले की, धर्मकार्य करतांना साधना म्हणून करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे ईश्वराचा आशीर्वाद मिळून कार्य निर्विघ्नपणे पार पडते. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. मोहिनी मांढरे यांनीही मार्गदर्शन केले.
क्षणचित्रे
१. पोलिसांशी संपर्क कसा करावा याचे प्रात्यक्षिक कार्यशाळेत घेण्यात आले. प्रात्यक्षिकानंतर पोलिसां विषयीची भीती दूर झाली, असे धर्मप्रेमींनी सांगितले.
२. माहितीचा अधिकार या कायद्याचा वापर कसा करावा याचा अभ्यास वर्ग घेण्याचा निर्धार धर्म प्रेमींनी व्यक्त केला.
अभिप्राय
१. कार्यशाळेत सहभागी होऊन मन प्रसन्न झाले. ज्या गोष्टी आम्हाला माहिती नव्हत्या त्याचा न्याय मिळाले. हिंदु राष्ट्रासाठी एक संघटक म्हणून आम्ही कृती करणार आणि एकत्र येण्याचा सतत प्रयत्न करणार. – श्रीमती कविता धुरी, तळोजा
२. कार्यशाळेच्या माध्यमातून धर्मासाठी कार्य वाढवण्याची मनात तीव्र इच्छा निर्माण झाली. स्वतःच्या भागात मी धर्माचा प्रसार करेन. मी स्वतः प्रशिक्षण घेऊन साधनेचे महत्त्व लोकांना पटवून देईन. – श्री. संजय उलवेकर, खिडुकपडा, कळंबोली.
३. हिंदु जनजागृती समितीचे कार्य महान आहे. हिंदु राष्ट्र आले पाहिजे. कार्यशाळेचा हेतू स्पष्ट झाला. कायद्याचे ज्ञान मिळाले. समितीचे कार्य प्रेरणादायी आहे. साधनेचा भाग पुष्कळ छान होता. मी त्याचे अनुकरण करून इतरांना त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रयत्न करीन. – श्री. संतोष राणे, तळोजा