- जमावाला गोरक्षणासाठी कायदा का हातात घ्यावा लागतो, याचा विचार कोण आणि कधी करणार ?
- भाजपच्या राज्यातही गोरक्षणासाठी जमावाला कायदा हातात घ्यावा लागत असेल, तर हे भाजपला लज्जास्पद आहे !
जयपूर : राजस्थानच्या अल्वर जिल्ह्यातील रामगड भागात जमावाने गोतस्करी करणार्या अकबर खान या २८ वर्षीय तरुणाला केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. (गोतस्करीच्या प्रकरणात अल्पसंख्यांकच कसे असतात ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) तो हरियाणातील कोलगावाचा रहाणारा होता. अकबर २० जुलैला रात्री त्याच्या मित्रासह २ गायी घेऊन जात होता. लल्लावंडी गावाजवळून जात असतांना काही गावकर्यांनी त्यांना गोतस्करी करत असल्यावरून हटकले आणि मारहाण केली. या मारहाणीत अकबर गंभीररित्या घायाळ झाला. पोलिसांनी अकबरला रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
अकबर आणि त्याचा मित्र गायीची तस्करी करत होते का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांना मारहाण करणार्यांचा शोध घेतला जात असून त्यांना लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे शिंदे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून ‘दोषींवर कठोर कारवाई केली जाईल’, असे म्हटले आहे. खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मोदी सरकारचा ४ वर्षांचा काळ खुनी राजवटीचा काळ आहे, असा आरोप केला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात