वाराणसी (उत्तरप्रदेश) : महाराष्ट्रातील शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्चर मंदिराचे सरकारीकरण आणि कर्नाटकामध्ये काँग्रेस सरकारकडून हज हाऊसला टिपू सुलतानचे नाव देणे याला विरोध करण्यासाठी येथील वरुणा पुलाजवळील शास्त्री घाटावर राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. यात ‘हिंदु युवा वाहिनी’चे प्रदेश उपाध्यक्ष श्री. मनीष पांडे, ‘हिंदु युवा शक्ती’चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. निर्भय सिंह, विश्व सनातन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. अनिल सिंह, ‘इंडिया विथ विस्डम’चे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी, ‘हिंदु जागरण मंच’चे प्रांत संयोजक अधिवक्ता दिनेश नारायण सिंह, ‘मां शीतलामंदिर मंदिर समिती’चे श्री. संदीप भारती, तसेच हिंदु जनजागृती समितीचे उत्तरप्रदेश आणि बिहार राज्य समन्वयक श्री. विश्वनाथ कुलकर्णी उपस्थित होते.
वाराणसी (उत्तरप्रदेश) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन
Tags : Hindu Janajagruti SamitiHindu Rashtra Jagruti AndolanSanatan-Sansthaअल्पसंख्यांकांचे लांगूलचालनमंदिरे वाचवाहिंदूंच्या समस्या