प्रशासन आणि पोलीस अनभिज्ञ !
- भाजपच्या राज्यात हिंदूंची अशी स्थिती भाजपला लज्जास्पद !
- यावरून देशात धर्मांतरविरोधी कायद्याची अपरिहार्यता लक्षात येते. केंद्रातील भाजप सरकार तो कायदा करणार का ?
जौनपूर (उत्तरप्रदेश) : जौनपूर जिल्ह्यातील बढयापूर गावातील १०० पैकी ९५ टक्के हिंदु परिवार आता ख्रिस्ती झाले आहेत. त्यांना आमीष दाखवून ख्रिस्ती बनवण्यात आले आहे. येथे साप्ताहिक प्रार्थना सभेच्या नावाखाली ख्रिस्ती मिशनरींनी त्यांचे धर्मांतर केल्याचे समोर आले आहे. धर्मांतर केलेल्या हिंदूंनी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्याचे मान्य केले आहे.
१. गावातील लाल बहादुर यांच्या घरी ख्रिस्ती मिशनरी साप्ताहिक प्रार्थना होते. या व्यतिरिक्त भूलनडीह गावातील दुर्गा यादव यांच्या घरीही साप्ताहिक प्रार्थना होते. प्रत्येक रविवार आणि मंगळवार या दिवशी प्रार्थना सभा घेतल्या जात होत्या. याचा अत्यंत गोपनीय पद्धतीने प्रचार करण्यात आला होता. आता जमुनीबारी गावाच्या मैदानात प्रत्येक शुक्रवारी प्रार्थना सभा होत असून त्याला ५ सहस्र लोक येतात.
२. हरिहरपूरचे सरपंच शिव बालक यादव यांना याविषयी विचारणा केली असता त्यांना याची माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.
३. केराकतचे उपजिल्हाधिकारी सहदेव मिश्र यांनी सांगितले की, बढयापार गावातील हिंदूंच्या धर्मांतराविषयी काहीच माहिती नाही. जर कोणी स्वेच्छेने धर्मांतर करत असेल, तर त्याला आम्ही रोखू शकत नाही.
४. चंदवक पोलीस ठाण्याचे अधिकारी शशिचंद्र चौधरी यांनी सांगितले की, माझ्या माहितीनुसार, असे काहीही घडलेले नाही. जर कोणी आमीष दाखवून बलपूर्वक धर्मांतर करत असेल, तर कारवाई केली जाऊ शकते. आम्हाला माहिती मिळाल्यावर यावर लक्ष ठेवू शकतो.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात