श्रीलंकेतील हिंदु तमिळींचा वंशसंहार अद्यापही चालूच
- केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे श्रीलंकेतील हिंदु तमिळींच्या होणार्या वंशसंहारांवर लक्ष आहे का ?
- भारतातील सर्वत्रच्या हिंदुत्वनिष्ठ संघटना एवढी वर्षे झोपल्या आहेत का ? कि त्या तमिळी हिंदूंना ‘हिंदु’ समजत नाहीत ?
कोलंबो (श्रीलंका) : वर्ष १९८३ मधील जुलै मासातच श्रीलंकेत ३ सहस्रांपेक्षा अधिक हिंदु तमिळांचा वंशसंहार झाला होता. हिंदूंची दुकाने, बँका, कार्यालये आणि उपहारगृहे कोलंबोतील मुख्य रस्त्यांवर जळत असतांना श्रीलंकेतील पोलीस मूकपणे बघत होते. सहस्रो घरे लुटली गेली आणि काही ठिकाणी स्त्रिया अन् मुले घरात असतांना आगीत भस्म केली गेली. अद्यापही येथे हिंदु तमिळांचा वंशसंहार चालूच आहे. श्रीलंकेतील हिंदु तमिळांना शक्य तेवढ्या लवकर संपवून तेथे बौद्ध देश निर्माण करण्याचे कार्य वेगात चालू आहे. तरीही भारतातील हिंदुत्वनिष्ठ संघटना किंवा हिंदु नेते आतापर्यंत हिंदु तमिळांचे रक्षण करण्यासाठी पुढे आले नाहीत, हे धक्कादायक आहे.
भारतातील हिंदूंनी वरील परिस्थिती समजून घेऊन खूप उशीर होण्याआधी लगेच श्रीलंकेतील तमिळी हिंदूंना साहाय्य करावे, अशी विनंती कॅनडा येथील हिंदु तमिळी नेते श्री. कुमाररथन रनसिंघम यांनी केली आहे.
श्री. रनसिंघम यांनी म्हटले आहे की,
१. श्रीलंकेतील इतर नागरिकांप्रमाणेच तमिळी हिंदूंना आत्मनिर्णय करण्याच्या अधिकारांसह शांततेत राहू द्यावे; मात्र ही मागणी करतांना त्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. त्यांच्या दुःखालाही मर्यादा नाही.
२. वर्ष १९५६, १९५८, १९७१, १९७७, १९८३, १९९३ आणि वर्ष २००४-०५ या कालावधीत हिंदु तमिळींच्या विरोधात झालेल्या दंगलीत २ लाखांपेक्षा अधिक हिंदु तमिळी मारले गेले अन् १० लाखांपेक्षा अधिक हिंदु तेथून परागंदा झाले. एकेकाळी श्रीलंकेत हिंदु राजाची राजवट होती.
३. श्रीलंकेतील न्यायपालिका, सैन्य आणि सरकार हिंदु तमिळांच्या विरोधात आहे; कारण वंशसंहारात सहभागी असणार्या कोणावरही आरोप लावण्यात आलेले नाहीत किंवा कुणालाही शिक्षा केलेली नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात