कराड : हिंदवी स्वराज्यावर चालून आलेले प्रत्येत संकट शिवछत्रपतींनी बाणेदारपणे परतवून लावले. आपले शरीर नाशवंत आहे; परंतु शिवछत्रपतींचे विचार आपल्या मनात चिरकाल टिकणारे आहेत. मनातील छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना जिवंत करण्यासाठी प्रत्येकाने नेटाने प्रयत्न केले पाहिजेत. औरंगजेब जरी मेला असला, तरी ओवैसीच्या रूपाने तो आजही जिवंत आहे, असे प्रतिपादन श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले. येथील सरस्वती शिशुवाटिकेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी कराड आणि पंचक्रोशीतील ७० हून अधिक युवक उपस्थित होते.
पू. संभाजीराव भिडेगुरुजी पुढे म्हणाले की,
१. शेकडो वर्षे दास्यत्वात राहून हिंदूंचे रक्त महारोग्याचे रक्त झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्यासाठी लढले, आज त्यांचेच रक्त थंडावले आहे.
२. गेल्या ७० वर्षांत एकातरी खासदाराने चीनने कह्यात घेतलेल्या प्रांताविषयी लोकसभेत काही वक्तव्ये केली का ? हिंदूंना चायनीज खातांना शत्रू आणि मित्र यांचे भान नाही. आज देशद्रोही इशरत जहाँ कशी चांगली होती, हे सांगण्यासाठी बारामतीपासून प्रारंभ होतो.
३. हिंदु समाजाने छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान हृदयात ठेवले पाहिजे. ओवैसीसारख्या औरंगजेबाशी असलेला लढा अजून संपलेला नाही. हे युद्ध दोन व्यक्तींमधील नसून दोन संस्कृतींमधील आहे. स्वातंत्र्यसंग्रामाला विजयावाचून अंत नाही !
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात