Menu Close

शनैश्‍चर मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात नांदेड येथे हिंदुत्वनिष्ठांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

नांदेड : महाराष्ट्र सरकारने शनिशिंगणापूर येथील शनैश्‍चर मंदिराचे  सरकारीकरण करून ते कह्यात घेण्याचे योजले असून त्या विरोधात येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी श्री. जयसिंह कारभारी यांच्याकडे निवेदन देण्यात आले.

या वेळी बंजारा परिषदेचे महासचिव डॉ. मोहन चव्हाण, अधिवक्ता शंकरसिंह ठाकूर, श्रीराम जन्मोत्सव समितीचे जिल्हाध्यक्ष गणेशसिंह ठाकूर, अधिवक्ता जगदिश हाके, करणी सेनेचे जिल्हाध्यक्ष रवीसिंह चौहान, राजपूत करणी सेनेचे युवा जिल्हाध्यक्ष रवीसिंह ठाकूर, अखिल भारतीय क्षत्रिय महासभेचे शहर संघटक श्री. दिपकसिंह चंदेले, श्री योग वेदान्त सेवा समितीचे हिंगोली जिल्हा उपाध्यक्ष शिवकैलास कुंटुरकर, बजरंग दल जिल्हा सहसंयोजक श्री. महेश बेढरवार, अधिवक्ता संतोष हाळवे, हिंदु जनजागृती समितीचे उदय बडगुजर तसेच धर्मप्रेमी सर्वश्री बिरबल यादव, गणेश गादेवार, सुशिल कोमतवार, गौतम जैन, गजानन शहाणे, नीलेश बैस हे उपस्थित होते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *