Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांची खासदार आनंदराव अडसूळ यांच्याशी सदिच्छा भेट

(खुर्चीत बसलेले) खासदार श्री. आनंदराव अडसूळ यांना माहिती देतांना श्री. नीलेश टवलारे आणि शेजारी सौ. कंचन ठाकूर

अमरावती : मंदिर सरकारीकरणाचा निर्णय चुकीचा आहे. भारतीय जनता पक्ष हिंदूंचाच पक्ष असूनही हिंदूंचाच विश्‍वासघात करत आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे खासदार श्री. आनंदराव अडसूळ यांनी केले. हिंदु जनजागृती समितीचे अमरावती जिल्हा समन्वयक श्री. नीलेश टवलारे यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते.

हिंदु जनजागृती समितीचे कार्य उत्तम आहे ! – विजयराज शिंदे, माजी आमदार

डावीकडून श्री. नीलेश टवलारे, श्री. विजयराज शिंदे, सौ. कंचन ठाकूर, डॉ. देवेंद्र देशपांडे

शिवसेनेचे माजी आमदार, तसेच अमरावती जिल्हा संपर्क प्रमुख श्री. विजयराज शिंदे यांनीही मंदिर सरकारीकरण कायद्याचा निषेध केला. ‘बुलढाणा येथे हिंदु धर्मजागृती सभा घ्यावी आणि त्याला मी सर्वप्रकारे साहाय्य करीन. समितीचे कार्य उत्तम आहे’, असे श्री. शिंदे या वेळी म्हणाले. हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना समितीचे कार्य सविस्तर सांगितले. या वेळी शिवसेनेच्या धर्मप्रेमी सौ. कंचन ठाकूर, श्री. आनंद डाऊ आणि डॉ. देवेंद्र देशपांडे उपस्थित होते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *