सर्वोच्च न्यायालयाचा याचिकेवर सुनावणी करण्यास नकार
- बौद्धांचे बोधगया, लुंबिणी यांच्या प्रार्थनास्थळांच्या जागा हिंदूंच्याच आहेत, असे हिंदूंनी म्हटल्यास चुकीचे काय ?
- हिंदु धर्म हा सहस्रो वर्षे पुरातन असून भारतात तेव्हापासून केवळ हिंदूंचीच मंदिरे होती. त्यामुळे भारतातील भूमी केवळ हिंदूंचीच आहे !
नवी देहली : अयोध्येतील राममंदिराच्या जागेवर हिंदु आणि मुसलमान यांच्या पाठोपाठ आता बौद्धांनी दावा केला आहे. अयोध्येत रहाणारे विनीत कुमार मौर्य यांच्यासह बौद्ध समाजातील काही लोकांनी वरील दाव्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट केली आहे. ‘त्या जागेवर पूर्वी बुद्ध विहार होते’, असे त्यांनी याचिकेत नमूद केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने मुख्य खंडपिठाकडे राममंदिराच्या जागेची सुनावणी चालू असल्याचे सांगत याचिकेवरील सुनावणीस नकार दिला आहे.
विनीत कुमार मौर्य यांनी याचिकेत म्हटले आहे की, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने त्या जागेवर ४ वेळा ५० ठिकाणी खोदकाम केले आहे. तिथे मंदिराचे किंवा हिंदु धर्माशी संबंधित कोणतेही अवशेष सापडलेले नाहीत. (खोटे बोलणारे मौर्य ! पुरातत्व खात्याने केलेल्या खोदकामाच्या माहितीवरूनच अलाहाबाद उच्च न्यायालयाने तेथे राममंदिर असल्याचे मान्य करत ती जागा हिंदूंची असल्याचा निकाल यापूर्वी दिला आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) बाबरी मशीद निर्माण होण्यापूर्वी त्या जागेवर बुद्ध विहार होते. पुरातत्व विभागाला खोदकामात या ठिकाणी स्तूप, भिंत, गोलाकार स्तूप आणि खांब सापडले आहेत. बुद्ध विहारांची विशेषता अधोरेखित करणार्या या गोष्टी असल्याने त्या ठिकाणी बुद्ध विहारच होते, हे यावरून स्पष्ट होते. (असे काहीही येथे सापडलेले नाही. तसे असते, तर पुरातत्व खात्याने सादर केलेल्या माहितीत याचा उल्लेख असता ! भारतासह श्रीलंकेतील अनेक मंदिरांवर बौद्धांनी अतिक्रमण करून त्यांचे स्तूप बनवले आहेत आणि याचे पुरावेही दिसून आले आहेत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात