अशा घटनांच्या वेळी महिला मानवाधिकार संघटना आणि पुरो(अधो)गामी संघटना कुठे झोपलेल्या असतात ?
डेहरादून : उत्तराखंडमधील रायपूरमध्ये ४० वर्षीय रईस कुरेशी याने त्याच्या २१ वर्षीय गरोदर पत्नीला तोंडी तलाक दिला आहे. तोंडी तलाकवर बंदी असतांनाही कुरेशीने तो दिल्याने त्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली आहे. यासाठी तिला स्थानिक बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी साहाय्य केले. कुरेशी याने पत्नीला पोटगी देण्यासही नकार दिला आहे. गेल्या वर्षी पीडित पत्नीचे कुरेशीबरोबर लग्न झाले होते. या महिलेने पहिल्या पतीला ‘एड्स’ असल्याने घटस्फोट दिला होता. या महिलेला पहिल्या पतीपासून २ मुलेही आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात