Menu Close

अमरावती आणि वणी (जिल्हा यवतमाळ) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात सरकारने हिंदूंची मंदिरे कह्यात घेऊन पाप करू नये ! – नरेंद्र केवले, शिवसेना, अमरावती विधानसभा संघटक

अमरावती : हिंदूंच्या मतांवर निवडून आलेले भाजप सरकार हिंदूंचाच विश्‍वासघात करत आहे. मंदिरे कह्यात घेऊन पाप करत आहे. हिंदु जनजागृती समितीच्या याविषयी घेतलेल्या या आंदोलनाला शिवसेनेच्या वतीने मी पाठिंबा दर्शवत आहे आणि याचा आम्ही नेहमी विरोध अन् पाठपुरावा करत रहाणार, असे प्रतिपादन  शिवसेनेचे श्री. नरेंद्र केवले यांनी केले. अमरावती येथील जयस्तंभ चौक या ठिकाणी २० जुलै यादिवशी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत राष्ट्र्रीय हिंदू आंदोलन पार पडले. त्या वेळी ते बोलत होते.

यामध्ये नुकत्याच संमत झालेल्या शनी मंदिर सरकारीकरण कायद्याला विरोध करण्यात आला. त्यासोबतच कर्नाटक येथील हज हाऊसला क्रूरकर्मा टिपू सुलतानचे नाव देण्याचा निर्णय रहित करावा, अशीही मागणी या वेळी करण्यात आली.

आंदोलनामध्ये सनातन संस्थेच्या सौ. विभा चौधरी, योग वेदांत सेवा समितीचे श्री. मानव बुद्धदेव, राष्ट्रीय बजरंग दलाचे श्री. मुकुल कापसे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. नीलेश टवलारे यांनीही याविषयी त्यांचे मत व्यक्त केले.

या वेळी बजरंग दल जिल्हा संयोजक श्री. विपीन गुप्ता, विश्‍व हिंदु परिषदेचे जिल्हामंत्री श्री. शरद अग्रवाल, विश्‍व हिंदु परिषदेचे श्री. सागर खेडकर, अंबादेवीच्या संस्थानच्या अध्यक्षा सौ. विद्याताई देशपांडे, शिवसेनेच्या सौ. कांचन ठाकूर हे मान्यवर आंदोलनाला उपस्थित होते. या आंदोलनाला ४५ धर्मप्रेमींची उपस्थित होते.

विशेष

१. आंदोलनाच्या वेळी एक धर्मप्रेमीने स्वतः स्वाक्षरी केली आणि आसपासच्या दुकानांमध्ये जाऊन स्वाक्षर्‍या गोळ्या केल्या !

२. एका धर्मप्रेमीने स्वतःहून सहभाग घेऊन ‘‘यापुढे समितीच्या सर्व उपक्रमांमध्ये सहभागी होणार’’, असे सांगितले.

३. ३० कि.मी. अंतरावरून ग्रामीण भागातून धर्मप्रेमी आंदोलनात सहभागी झाले.

४. फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून २८ सहस्र धर्मप्रेमींपर्यंत हे आंदोलन पोहोचले.

वणी (यवतमाळ) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

वणी (यवतमाळ) : येथील तहसील चौक येथे झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात कर्नाटकच्या सरकारने हज भवनला क्रूरकर्मा टिपू सुलतानचे नाव देण्याचा निर्णय रहित करण्यात यावा आणि श्री शनैश्‍चर देवस्थानाचे सरकारीकरण रहित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.

या आंदोलनातील निवेदनांवर २०० जणांनी स्वाक्षर्‍या केल्या. त्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालयात देण्यात आले. या आंदोलनाला १८ जण उपस्थित होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. लोभेश्‍वर टोंगे आणि श्री. लहू खामणकर यांनी मार्गदर्शन केले.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *