Menu Close

तळोजा येथे क्रांतीकारकांच्या फ्लेक्स प्रदर्शनाच्या माध्यमातून जागृती !

पनवेल : तळोजा येथील कै. कमळू पाटील माध्यमिक विद्यालयात सनातन संस्था चेन्नई या न्यासाच्या वतीने राष्ट्रभक्ती जागृत करणारे सचित्र क्रांतीकारकांचे फलक प्रदर्शन १६ जुलै या दिवशी लावण्यात आले. या प्रदर्शनाचा लाभ विद्यालयातील ३५० विद्यार्थ्यांनी घेतला.

क्रांतीकारकांचा आदर्श घेऊन मार्गक्रमण करा ! – सौ. नीला गडकरी, सनातन संस्था चेन्नई

सनातन संस्था न्यासाच्या सदस्या सौ. नीला गडकरी म्हणाल्या की, क्रांतीकारकांनी देशासाठी प्राणांचे बलीदान दिले. त्यांचा आदर्श  घेऊन आपणही राष्ट्राभिमानी बनायला हवे. भारतीय संस्कृतीचे पालन केल्याने राष्ट्रभक्ती जागृत होते.

क्रांतीकारकांचे गुण आपण आत्मसात करून खर्‍या अर्थाने भारतीय बनूया !  – बळवंत पाठक, हिंदु जनजागृती समिती

या वेळी समितीचे रायगड जिल्हा समन्वयक श्री. बळवंत पाठक म्हणाले की, आज आपले आदर्श स्वाभिमानशून्य नट आणि नट्या हे आहेत; परंतु खरे आदर्श देशासाठी प्राणाची आहुती देणारे आपले क्रांतीकारक आहेत. त्यांचे गुण आत्मसात केल्यास खर्‍या अर्थाने आपण भारतीय बनू शकतो.

या प्रदर्शनाच्या माध्यमातून देशप्रेम जागृत करा ! – एम. डी. बोराटे, प्राध्यापक

प्रदर्शनात क्रांतीकारकांची माहिती छायाचित्रासह देण्यात आली आहे. यामुळे क्रांतीकारक कोण कोण होते याची आपल्याला माहिती मिळेल. त्यांचे कार्य जाणून त्यांचे गुण कृतीत आणूया.

आपले आदर्श देशासाठी प्राण देणारे क्रांतीकारकच आहेत ! – सी.जी. हिरमेठ, प्राध्यापक

न्यासाने सिद्ध केलेले प्रदर्शन प्रेरणादायी आहे. ही माहिती लिहून घेऊया. आपले आदर्श देशासाठी प्राण देणारे क्रांतीकारकच आहेत. या क्रांतीकारकांची माहिती व्हावी म्हणून हे प्रदर्शन पाहणे महत्त्वाचे आहे.

क्षणचित्रे

१. प्राध्यापक सी. जी. हिरमेठ, एम.डी. बोराटे आणि सनातन संस्था चेन्नई न्यासाच्या सदस्या सौ. नीला गडकरी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला आरंभ झाला.

२. स्वराज्य मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. गुरुनाथ मुंबईकर यांनी क्रांतीकारकांच्या फ्लेक्सचा संच जागृती होण्यासाठी छापून घेतला. विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रप्रेम निर्माण व्हावे, यासाठी ठिकठिकाणी असे कार्यक्रम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *