Menu Close

(म्हणे) भारतात आज मुसलमानांना जगण्याचा अधिकार नसून गायींना मात्र आहे : असदुद्दीन ओवैसी

  • असे आहे, तर देशाला स्वातंत्र्य मिळाले, त्या वेळी मुसलमानांची लोकसंख्या ६ टक्के, तर गायींची संख्या अनुमाने १० कोटी होती आणि आता मुसलमानांची लोकसंख्या १८ टक्के असून गायींची संख्या जेमतेम १ कोटीदेखील नाही. यावरून ‘भारतात कोण असुरक्षित आहे’, हे कळते !
  • जर गाय सर्वाधिक सुरक्षित असती, तर भारत गोमांस निर्यातीमध्ये जगात अग्रेसर देश कसा झाला असता ?

नवी देहली : ज्या ठिकाणी भाजपचे सरकार आहे, त्या ठिकाणी जमावाच्या मारहाणीत हत्या होण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. याचे कारण म्हणजे मोदी सरकारचे मंत्री आणि भाजपचे नेते आरोपींच्या बाजूने उभे रहातात. भारतात आज मुसलमानांना जगण्याचा अधिकार नाही; मात्र गायींना तो आहे. उदाहरण घ्यायचे झाल्यास रकबर उपाख्य अकबर खान याला जमावाकडून मारहाण झाल्यानंतर पोलिसांनी अगोदर गायीला पोहोचवले आणि त्यानंतर रकबार खानला रुग्णालयात नेले, असे विधान ‘एम्आयएम्’चे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी जमावाच्या मारहाणीच्या प्रकरणावर केले.

ते पुढे म्हणाले, ‘‘जोपर्यंत भाजपचे सरकार आहे, तोपर्यंत हेच घडत रहाणार. जर पंतप्रधान मोदी यांनी ठरवले, तर एकही हिंसेची घटना घडणार नाही. ते खूप काही करू शकतात. त्यांनी एकदा अशा घटना रोखण्याचे आदेश दिले, तर जमावाकडून मारहाणीच्या घटना ९९ टक्के थांबतील.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *