Menu Close

अखंड हिंदुत्त्वासाठी किमान पाच मुलांना जन्म दिला पाहिजे : भाजपा आमदाराची मुक्ताफळं

भाजपा आमदार सुरेंद्र सिंह यांच्या अज्ञानीपणाचे अजून एक उदाहरण ! केवळ हिंदूंची संख्या वाढल्याने नाही, तर हिंदूंमधे धर्माभिमान निर्माण झाल्यासच हिंदुत्वाचे रक्षण होऊ शकणार आहे. हिंदुत्वाचे रक्षण होण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक आहे ! – संपादक, हिंदुजागृती

काही दिवसांपुर्वी प्रभू रामदेखील वाढत्या बलात्काराच्या घटना थांबवू शकत नाही असं वक्तव्य करुन वाद निर्माण करणारे भाजपा आमदार सुरेंद्र सिंह यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. आपल्या वादग्रस्त आणि बेताल वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या सुरेंद्र सिंह यांनी यावेळी वादग्रस्त वक्तव्य करताना, ‘हिंदुत्व अखंड ठेवायचं असेल तर हिंदू दांपत्यांनी किमान पाच मुलांना जन्म दिला पाहिजे’, असं म्हटलं आहे.

एएनआयला दिलेल्या मुलाखतीत सुरेंद्र सिंह यांनी भारतात हिंदूंची लोकसंख्या वाढवण्यासाठी हे गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. ‘प्रत्येक अध्यात्मिक गुरुची इच्छा आहे की, प्रत्येक हिंदू दांपत्याने किमान पाच मुलांना जन्म द्यावा. यामुळे हिंदूंची लोकसंख्या नियंत्रित राहिल आणि हिंदुत्वही अखंड राहील’, असं सुरेंद्र सिंह बोलले आहेत.

संदर्भ : लोकसत्ता

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *