वॉशिंग्टन : अमेरिका बी-५२ वॉरप्लेन (युद्धविमान) सीरिया आणि इराकमधून इसिसच्या खातम्यासाठी पाठविणार आहे. आण्विक शस्त्रास्त्र नेण्यास सक्षम बी-५२ एप्रिलमध्ये बी-१ ची जागा घेईल. सीरिया-इराकमध्ये तैनात केले जाणारे बी-५२ कतार स्थित अमेरिकन हवाईतळावरून पाठविले जातील. सध्या तेथे जी बी-१ लान्सर प्लेन तैनात आहेत, त्यांना अपग्रेडेशनसाठी अमेरिकेत आणले जाणार आहे.
बी-५२ ला ‘बिग अगली फॅट फेलास’ या नावाने देखील ओळखले जाते. हे युद्धविमान ७० हजार टनापेक्षा अधिक पेलोड नेण्यास सक्षम आहे. पहिल्यांदा हे युद्धविमान १९५४ मध्ये वापरण्यात आले होते. २०४० पर्यंत हे विमान वापरण्यास योग्य राहण्याचा दावा अमेरिकेने केला आहे. बी-५२ ग्रॅव्हिटी, क्लस्टर बॉम्बसोबत गायडेड क्षेपणास्त्र डागण्यास सक्षम असून मोठय़ा प्रमाणात युद्धविषयक साहित्य नेण्यास विमान सक्षम आहे. अफगाणिस्तान, इराक युद्धात बी-५२ने करामत दाखविली आहे.
लेफ्टनंट जनरल माइक होम्स यांच्यानुसार बी-५२ अशक्यप्राय आव्हान प्रत्यक्षात उतरविण्याची शक्ती बाळगते. याला कोणत्याही आव्हानासाठी पाठविले जाऊ शकते. पेलोड असो किंवा अंतराचा मुद्दा बी-५२ प्रत्येक कसोटीवर खरे उतरते. साधारणतः बी-५२ प्रशिक्षण अभ्यासात वापरले जाते. मागील महिन्यात उत्तर-दक्षिण कोरियन सीमेवर बी-५२ ने आपली शक्ती दाखवून दिली होती.
संदर्भ : माझा पेपर