धर्मांध आरोपींना मृत मुलाच्या नातेवाइकांनी न्यायालयाच्या आवारात चोपले !
कल्याण : डोंबिवलीत मे मासात एका ड्रेनेजच्या टाकीत अथर्व वारंग (वय ७ वर्षे) या अल्पवयीन मुलाचा मृतदेह आढळला होता. अनैसर्गिक अत्याचार करून त्याची हत्या करण्यात आल्याचे शवविच्छेदनाच्या अहवालात उघड झाले होते. या प्रकरणी धर्मांध आरोपी एहसान साबीर आलम, नदीम जाकीर आलम यांना डोंबिवली पोलिसांनी १९ जुलैला कह्यात घेतले होते. त्यांना २४ जुलैला कल्याण न्यायालयात उपस्थित करण्यासाठी आणत असतांना अथर्वच्या नातेवाइकांचा संयम सुटल्याने त्यांनी आरोपींना मारहाण केली.
१. विशेष म्हणजे पोलिसांनी प्रथम जेथे मृतदेह मिळाला त्या बांधकाम व्यावसायिकावर केवळ गुन्हा नोंद करण्याचे सोपस्कार केले होते.
२. अर्थवच्या आईने पोलीस तपासाच्या उदासीनतेविषयी उपोषणाची चेतावणी दिली होती. त्यानंतर सूत्रे वेगाने फिरली आणि आरोपींना ५० दिवसांनी अटक करण्यात पोलीस यशस्वी झाले होते.
३. अटकेत असलेल्या दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे सांगत या दोघा नराधमाने मृत अथर्वच्या अपहरणानंतर त्याला गुंगीचे औषध देऊन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले.
४. त्यानंतर मृत झाल्याचे समजून त्याला इमारतीच्या ड्रेनेजच्या टाकीत टाकण्यात आले.
५. धर्मांध आरोपी एहसान साबीर आलम, नदीम जाकीर आलम यांना आज कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात उपस्थित केले असता २४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
प्रथम कल्याण न्यायालयाने ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यांची कोठडी संपल्याने २४ जुलैला पुन्हा दुपारच्या सुमारास त्यांना न्यायालयात उपस्थित करण्यासाठी पोलिसांनी आणले होते. या वेळी त्यांना पीडित मुलाच्या कुटुंबियांनी अमानुष मारहाण केली. या आरोपींना न्यायालयाने २७ जुलैपर्यंत पुन्हा ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात