गुरुग्राम (हरियाणा) : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील दौलताबाद पुलाजवळील पंचमुखी हनुमान मंदिरामध्ये सायंकाळी ६ ते ७ या वेळेत पाक्षिक धर्मशिक्षणवर्गाला प्रारंभ करण्यात आला. हा वर्ग प्रत्येक मासाच्या पहिल्या आणि तिसर्या शनिवारी घेण्यात येणार आहे.
पहिल्या वर्गामध्ये समितीच्या कु. कृतिका खत्री यांनी ‘नमस्काराची योग्य पद्धत कशी आहे?, नमस्कार करतांना काय करू नये?, नमस्कार केल्याने देवतेचे आशीर्वाद कसे मिळतात ?, मोठ्यांना नमस्कार कसा करावा? आदी माहिती देण्यात आली. तसेच दिवसभरात वेगवेगळ्या कृती करतांना नमस्कार करून प्रार्थना कशी करावी ?, याविषयी माहिती दिली.
क्षणचित्रे
१. उपस्थित धर्मप्रेमींनी सांगितले की, या वर्गाच्या माध्यमातून हिंदूंना त्यांच्या धर्माविषयी अनमोल माहिती मिळाली. अशा वर्गांचे आयोजन नियमित केले, तर आम्ही स्वतःच्या धर्माचे आचरण करू शकतो.
२. धर्मशिक्षणवर्गामध्ये सांगण्यात आलेले शास्त्र हिंदु धर्माचे मूळ आहे. ही माहिती सर्व हिंदूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न समिती करत आहे. हे कौतुकास्पद आहे.