शबरीमला मंदिरातील १० ते ५० वयोगटातील महिलांच्या प्रवेशाचे प्रकरण
नवी देहली : जर शबरीमला मंदिरामधील १० ते ५० वयोगटातील महिलांच्या प्रवेशावरील बंदी हटवण्यात आली, तर आणखी एका अयोध्येसारखी स्थिती होऊ शकते, असा युक्तीवाद या प्रकरणातील याचिकेवरील सुनावणीच्या वेळी मंदिराची बाजू मांडणार्या अधिवक्त्यांनी केला. त्यावर न्यायालयाने म्हटले की, केरळमधील मंदिरांतील प्रथा आणि परंपरा राज्यघटनेच्या सिद्धतांनुसार पडताळल्या जातील. त्या सिद्धांतावर त्या योग्य असणे आवश्यक आहे. (हिंदु धर्म राज्यघटना स्थापन होण्याच्या पूर्वीपासून अस्तित्वात आहे आणि त्यातील प्रथा परंपरांमागे शास्त्र आहे. या शास्त्रामागे अनेक कारणे आहेत. त्याचा अभ्यास करण्यास विज्ञान अद्याप मागे आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने म्हटले की, शबरीमला मंदिरामधील भगवान अय्यप्पा यांच्या ब्रह्मचारीत्वाचे सूत्र समोर असतांनाही आम्ही त्या सूत्रांकडे दुर्लक्ष करू शकत नाही, ज्यामुळे मासिक पाळी येणार्या १० ते ५० वयोगटातील महिलांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. परंपरांमध्ये पालट करण्याचा अधिकार असला पाहिजे; मात्र अशी कोणतीही अट असू नये की, ज्यामुळे भेदभाव निर्माण होत असेल. (परंपरांमध्ये पालट करण्याचा अधिकार धर्माचार्य, शंकराचार्य यांनाच असू शकतो ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात