Menu Close

कॅन्सरच्या उपचार आणि ‘मोठ्या कुटुंबाच्या’ उदरनिर्वाहासाठी ‘सलीम शेख’ने केल्या २० घरफोड्या

अशी अनेक उदाहरणे सातत्याने समोर येत आहेत. या उदाहरणावरून ‘आपल्या देशात लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा करणे किती आवश्यक आहे’ हे लक्षात येते. सरकारने याविषयी त्वरित कार्यवाही करावी, हीच जनतेची अपेक्षा आहे ! – संपादक, हिंदुजागृती

मुंबई : लोअर परळ येथील एका कार्यालयातून साडेअकरा लाखांची रोकड पळविणाऱ्या सलीम शेख (४६) याला ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी गेल्या आठवड्यात अटक केली. चौकशीमध्ये सलीम याने कॅन्सरच्या उपचारासाठी आणि कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहासाठी एकापाठोपाठ एक वीस घरफोड्या केल्याचे उघडकीस आले.

अधर्यू इंडस्ट्रीयल इस्टेटमधील एका कार्यालयातून साडेअकरा लाखांची रोकड चोरीला गेली. सीसीटीव्ही फुटेजवरून तो चोर सलीम असल्याचे समजले. तांत्रिक पुराव्यांवरून पोलिसांनी त्याचे उस्मानाबाद येथील घर शोधून काढले. या ठिकाणी सलीमची तिसरी पत्नी राहत होती. पोलिसांनी तिसऱ्या पत्नीच्या मोबाइलचे कॉल रेकॉर्ड तपासले त्यावेळी दादर येथील एका पीसीओवरून वारंवार कॉल येत असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी हा पीसीओ शोधून काढून सापळा लावला. या सापळ्यात मात्र सलीम अडकला. आपल्याला फुफ्फुसाचा कॅन्सर झाला असून त्यासाठी उपचार सुरू आहेत. त्यातच कुटुंब मोठे असल्याने उदरनिर्वाहासाठी घरफोड्या करीत असल्याचे त्याने सांगितले. लोअर परळ येथून चोरलेल्या साडेअकरा लाखांपैकी आठ लाख रुपये सलीमने तिसऱ्या पत्नीच्या खात्यात भरल्याचे तपासातून स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *