सनातन संस्था फोंडा आणि अन्य समविचारी संघटना यांच्या वतीने गोवा राज्यात ५ ठिकाणी, तर सनातन संस्था सिंधुदुर्ग अन् अन्य समविचारी संघटना यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी वक्त्यांनी केलेले ओजस्वी मार्गदर्शन आणि वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे पाहूया.
गोवा राज्यातील गुरुपौर्णिमा महोत्सवातील वक्त्यांचे मार्गदर्शन
हिंदु राष्ट्राला पूरक अशी धोरणे न राबवल्याने भारताला ग्रहण लागले ! – ह.भ.प. रामकृष्णबुवा गर्दे
सांखळी – आजपर्यंतच्या शासनकर्त्यांनी हिंदु राष्ट्राला पूरक अशी धोरणे न राबवल्याने देशाला ग्रहण लागले आहे. शासनकर्ते अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करत आहेत आणि हिंदूंवर स्वत:चे नियम लादत आहेत. आज हिंदूंवर आक्रमणे होत आहेत, असे प्रतिपादन ह.भ.प. रामकृष्णबुवा गर्दे यांनी येथील डेलमोन सभागृहात पार पडलेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवात केले.
ह.भ.प. गर्दे पुढे म्हणाले, परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे हिंदु राष्ट्राचे स्वप्न प.पू. भक्तराज महाराज यांच्या आशीर्वादामुळे पूर्ण होणार आहे.
हिंदूंनी स्वत:मधील भयगंड काढून ताठ मानेने जगले पाहिजे ! – महेश पारकर, साहित्यिक तथा हिंदुत्वनिष्ठ
फातर्पा – सर्वधर्मसमभाव, धर्मनिरपेक्षता आदींमुळे हिंदू विखुरले गेले अन् दुबळे बनले आहेत. दुबळ्या माणसांवर शक्तीमान माणसे वर्चस्व गाजवतात. हिंदू संकुचित झाल्यानेच त्यांच्यातील धर्माभिमान न्यून झाला आहे. हिंदूंनी मी हिंदु आहे, याची जाणीव ठेवत मनातील भयगंड काढून संघटितपणे आणि ताठ मानेने जगले पाहिजे. हिंदूंनी साधना करून धर्मकार्य केले पाहिजे, असे आवाहन हिंदुत्वनिष्ठ तथा साहित्यिक श्री. महेश पारकर यांनी केले. येथील श्री वेताळ देवस्थानाच्या श्री दिगेश सभागृहात झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवात वक्ते या नात्याने ते बोलत होते.
श्री. पारकर म्हणाले, परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्र येणार आहे, असे सांगितले आहे. हे संतवचन असल्याने ते सत्य ठरणारच आहे. परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी सर्वस्वाचा त्याग करून हिंदूसंघटनाचे कार्य आरंभले आहे. या कार्यात सर्वांनी सहभागी होणे आवश्यक आहे. प्रत्येक हिंदूने साधना करून त्यांच्या पाल्यांनाही सुसंस्कारित करावे.
नम्रतेने सेवा केल्यानेच गुरुकृपा होऊन जीवनाचे सार्थक होते ! – सूरज चोडणकर, मुख्याध्यापक, वसंत विद्यालय, शिवोली
पणजी – ८४ लक्ष योनींचा प्रवास केल्यानंतर मानव जन्म मिळतो. मानवजन्माचे सार्थक करण्यासाठी मनापासून आणि नम्रतेने सेवा करून गुरुकृपा संपादन केली पाहिजे, असे प्रतिपादन शिवोली येथील वसंत विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सूरज चोडणकर यांनी केले. येथील श्री महालक्ष्मी देवस्थान सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवात ते बोलत होते.
मुख्याध्यापक श्री. चोडणकर पुढे म्हणाले, जिजाऊंनी केलेल्या संस्कारांमुळेच छत्रपती शिवाजी महाराज घडले. काळानुसार एका प्रसंगी संत तुकाराम महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना क्षत्रिय धर्माची जाणीव करून दिली आणि त्यांना त्यातून हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा मिळाली. गुरु-शिष्य परंपरा ही एक थोर परंपरा आहे. महोत्सवाला सनातनच्या ४१ व्या संत पू. (श्रीमती) प्रमिला प्रभुदेसाई यांची वंदनीय उपस्थिती लाभली.
भारत हिंदु राष्ट्र म्हणून घोषित होईल; तेव्हाच महासत्ता बनेल ! – रमेश नाईक, माजी अध्यक्ष, शिवसेना गोवा विभाग
म्हापसा – आई-वडील आपल्याला जन्म देतात, तर गुरु आपल्याला घडवतात गुरूंचे आज्ञापालन केले पाहिजे. आज दिवसेंदिवस हिंदूंची स्थिती बिघडत चालली आहे. हिंदूंना फसवले जात आहे. हिंदू बहुसंख्य असूनही भारताला हिंदु राष्ट्र म्हणून घोषित केलेले नाही. भारत हिंदु राष्ट्र म्हणून घोषित होईल; तेव्हाच भारत महासत्ता बनेल, असे प्रतिपादन शिवसेनेचे गोवा विभागाचे माजी अध्यक्ष श्री. रमेश नाईक यांनी केले. श्री नारायणदेव देवस्थान, काणका, म्हापसा येथे पार पडलेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवात ते वक्ते म्हणून बोलत होते. या वेळी सनातनचे श्री. नागेश गाडे यांचीही उपस्थिती होती.
श्री. रमेश नाईक पुढे म्हणाले, परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी हिंदु राष्ट्राची संकल्पना मांडली आहे. सनातन संस्थेमुळे हिंदु राष्ट्राविषयी समाजात जागृती होत आहे. प्रत्येक हिंदूने गीता समजून दैनिक सनातन प्रभात विकत घेतला पाहिजे. हिंदूंवर होणार्या अन्यायाविषयी केवळ सनातन प्रभात आवाज उठवते.
कार्यक्रमाला पू. सुशिला आपटे यांची वंदनीय उपस्थिती लाभली. महोत्सवाला गोमंतक मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघाचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत (भाई) पंडित, श्री मारुति मंदिर देवस्थानचे अध्यक्ष तथा व्यावसायिक श्री. अमर कवळेकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
हिंदु राष्ट्राची निर्मिती ही काळाची आवश्यकता ! – कमलेश बांदेकर, अध्यक्ष, भारत स्वाभिमान, गोवा विभाग
फोंडा – हिंदु राष्ट्राची संकल्पना दिवसेंदिवस दृढ होत आहे आणि ही एक आनंदाची गोष्ट आहे. हिंदु राष्ट्राची निर्मिती ही काळाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन भारत स्वाभिमानचे गोवा विभागाचे अध्यक्ष श्री. कमलेश बांदेकर यांनी केले.
श्री. कमलेश बांदेकर पुढे म्हणाले, शिक्षणपद्धत, न्यायपद्धत, अर्थशास्त्र आदी घटक स्वदेशी असणे आवश्यक आहे, तसेच वेशभूषा, संस्कार आणि भाषाही स्वदेशी असायला हवी. यामुळेच हिंदु राष्ट्राची संकल्पना पूर्णत्वास जाण्यास साहाय्य होईल. प्रत्येक व्यक्तीचा मुख्य उद्देश ईश्वरप्राप्ती करणे हा असला पाहिजे आणि हाच भारत देशाचा मूळ गाभा आहे. जगातील इतर कोणत्याही देशामध्ये अशी संकल्पना आपणास पहायला मिळणार नाही.
फोंडा येथील गुरुपौर्णिमेला रोजंदारी कामगार श्री. मुथान्ना चव्हाण हे आले होते. त्यांना कार्यक्रम आवडला अन् त्यांनी स्वत:ची दिवसभराची मजुरी अर्पण केली.
सांखळी येथे हिंदु जनजागृती समितीचे राज्य समन्वयक डॉ. मनोज सोलंकी आणि म्हापसा येथे सनातनच्या सौ. अंजली नायक यांनी साधनेचे चिरंतन दृष्टीकोन आणि भावी कार्याची दिशा या विषयावर मार्गदर्शन केले.
फोंडा येथील सनातन आश्रमात हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे, फातर्पा येथे हिंदु जनजागृती समितीचे उत्तर गोवा समन्वयक श्री. गोविंद चोडणकर, पणजी येथे सनातनचे श्री. वैभव आफळे, सांखळी येथे हिंदु जनजागृती समितीचे दक्षिण गोवा समन्वयक श्री. सत्यविजय नाईक आणि म्हापसा येथे सनातनचे श्री. नागेश गाडे यांनी सेक्युलर लोकशाही आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र! या विषयावर मार्गदर्शन केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुरुपौर्णिमा महोत्सवातील महत्वाचे क्षण
सावंतवाडी
१. येथील गुरुपौर्णिमा महोत्सवास उपस्थित प.पू. दास महाराज यांचा सन्मान मळगाव, सावंतवाडी येथील सनातनचे साधक श्री. राजेंद्र शिरोडकर यांनी केला, तर पू. (सौ.) लक्ष्मी उपाख्य माई नाईक यांचा सन्मान सौ. राजेश्वरी शिरोडकर यांनी केला.
२. दैनिक सनातन प्रभातचे वाचक, प्रखर धर्माभिमानी तथा व्यावसायिक श्री. शरद भास्कर परब आणि सौ. श्वेता परब यांनी गुरुपूजन केले. धार्मिक विधींचे पौरोहित्य श्री. संतोष पंचपोर यांनी केले. येथे ७०० जणांची उपस्थिती होती.
कुडाळ
येथे श्री व्यासपूजन आणि गुरुपूजन दैनिक सनातन प्रभातचे वाचक श्री. संदीप चिऊलकर आणि सौ. संपदा चिऊलकर यांनी केले, तर पौरोहित्य श्री. कौशल दामले यांनी केले. येथे ८०० जिज्ञासू उपस्थित होते.
देवगड
येथे श्री. सुरेश पुजारे आणि सौ. श्रद्धा पुजारे यांनी व्यासपूजन आणि गुरुपूजन, तर श्री. आनंद जोशी यांनी पौरोहित्य केले. सद्गुरु सत्यवान कदम यांचा सन्मान धर्मप्रेमी श्री. दीपक काशीराम वारीक यांनी, तर वक्ते डॉ. संजय सामंत यांचा सत्कार धर्मप्रेमी श्री. संतोष भाऊ नाईक-धुरे यांनी केला. येथे ५७५ जिज्ञासू उपस्थित होते.
कणकवली
धर्माभिमानी श्री. यशवंत मनोहर लाड आणि सौ. अनघा यशवंत लाड, कलमठ यांनी गुरुपूजन केले. पौरोहित्य वेदमूर्ती श्री. कांचन काजरेकर यांनी केले. येथे २७० जणांची उपस्थिती होती. वक्ते श्री. सुमित सागवेकर यांचा सत्कार मांगरवाडी, वागदे येथील धर्मप्रेमी कु. प्रतीक्षा सुधाकर गोसावी यांनी केला.
मालवण
श्री. मंगेश शेर्लेकर आणि सौ. प्रणाली शेर्लेकर यांनी गुरुपूजन केले. पौरोहित्य श्री. सचिन वझेगुरुजी यांनी केले. येथे ३०० जिज्ञासू उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महोत्सवांतील विशेष उपस्थिती
१. कणकवली येथे वैभववाडी पंचायत समितीचे सभापती श्री. लक्ष्मण उपाख्य राजू रावराणे, तसेच दैनिक पुढारीचे प्रतिनिधी श्री. अजित सावंत, दैनिक लोकमतचे प्रतिनिधी श्री. सुधीर राणे, राज्य परिवहन महामंडळाचे येथील विभाग नियंत्रक श्री. यशवंत सीताराम रसाळ उपस्थित होते.
२. मालवण येथील गुरुपौर्णिमा महोत्सवाला मालवण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नगरपरिषद सदस्य श्री. पंकज सादये, जिल्हा परिषद सदस्य श्री. हरि खोबरेकर उपस्थित होते. त्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
१. सावंतवाडी : इयत्ता १२ वीच्या परीक्षेत यश संपादन केलेले विद्यार्थी साधक कु. लक्ष्मी राऊळ आणि कु. सोहम् गावडे, तसेच इयत्ता १० वीच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या कु. सेजल शेटकर अन् कु. नयना पांगम यांचा सत्कार करण्यात आला.
२. देवगड : कु. रोशनी दिवाकर शिंदे हिने इयत्ता १० वीच्या परीक्षेत ८५ टक्के गुण मिळवून यश प्राप्त केल्याविषयी तिचा सत्कार करण्यात आला.
३. कुडाळ : इयत्ता १० वीच्या परीक्षेत यश प्राप्त केलेल्या कु. शार्दुल प्रदीप चव्हाण, कु. सिद्धी सीताराम परब आणि इयत्ता १२ वीच्या परीक्षेत यश प्राप्त केलेले कु. तृप्ती विजय मेस्त्री आणि कु. अदिती प्रदीप तवटे यांचा सत्कार करण्यात आला.
४. कणकवली : इयत्ता १० वीच्या परीक्षेतील यशासाठी कु. दिव्या शिंत्रे, कनेडी; कु. चेतना दर्डे, आचिण; मांगरवाडी, वागदे येथील धर्मशिक्षणवर्गातील युवक सुयश गोसावी, तसेच इयत्ता १२ वीच्या परीक्षेतील यशासाठी कु. स्नेहा दर्डे, आचिर्णे हिचा, तर कु. मधुरा कदम यांनी पदवी परीक्षा (बी.एस्सी.) प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केल्याविषयी सत्कार करण्यात आला.
५. मालवण : इयत्ता १० वीच्या परीक्षेत यश संपादन केलेला कु. तेजस नाईक आणि फळप्रक्रिया पदविका अभ्यासक्रम ७६.८० टक्के गुणांसह उत्तीर्ण झालेला कु. रोहित गावडे यांचा सत्कार करण्यात आला.
क्षणचित्रे
१. देवगड येथे साध्या वेशात आलेल्या २ पोलिसांनी कार्यक्रमाचे चित्रीकरण केले. (नि:स्वार्थी वृत्तीने राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करणार्या हिंदुत्वनिष्ठांच्या कार्यक्रमाचे चित्रीकरण करण्यापेक्षा पोलिसांनी हा वेळ आतंकवाद्यांना पकडण्यासाठी वापरला असता, तर एव्हाना देश आतंकवादमुक्त झाला असता. – संपादक) हा कार्यक्रम खासगी असल्याचे त्यांना सांगितल्यावर त्यांनी चित्रीकरण करण्याचे थांबवले.
२. कणकवली येथे प्रथमोपचारवर्ग आणि ८ ठिकाणी स्वरक्षण वर्ग चालू करण्याची मागणी करण्यात आली.
३. मालवण येथे श्री. संजय गोवेकर यांनी कार्यक्रमस्थळी लावलेल्या औषधी वनस्पतींच्या प्रदर्शनात स्वयंस्फूर्तीने औषधी वनस्पतींची मांडणी केली. स्वत:हून वनस्पतींची नावे लिहून कक्ष आकर्षक बनवला.
अभिप्राय
सनातनच्या सात्त्विक वह्यांचे समाजात वितरण करू ! – महेश कांदळगावकर, नगराध्यक्ष, मालवण
प्रदर्शनाच्या ठिकाणी सनातनच्या सात्त्विक वह्या पाहिल्यानंतर नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी पुढील वर्षी सनातनच्या सात्त्विक वह्यांची मागणी करून त्यांचे समाजात वितरण करू, असे सांगितले.
१. मालवण येथील शिवसंग्रहालयाचे प्रमुख श्री. उदय रोगे यांनी कार्यक्रम पाहिल्यानंतर व्याख्यानात घेतलेली सूत्रे काळानुसार मांडली गेली. सर्वांनी एकत्र येऊन विषय समजून घेऊया, असे सांगत पुढील गुरुपौर्णिमेला अधिकाधिक जिज्ञासूंना घेऊन येईन, असे सांगितले.
२. मालवण येथील श्री. पंकज नेरकर यांनी धर्मकार्यासाठी म्हणून स्वागतकक्षात स्वत:हून अर्पण आणून दिले.
३. श्री. आप्पा भिकाजी लुडबे, मालवण यांनी प्रवचनातील सूत्रे मला द्या. मी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, असे सांगितले.
सनातन संस्था सिंधुदुर्ग न्यासाच्या वतीने सहकार्य केलेल्यांचे आभार
कुडाळ : श्री. अरूण पेडणेकर यांनी सभागृह अल्प मूल्यात उपलब्ध करून दिले. सौ. पद्मा दामले यांनी आसंद्या आणि खाऊ दिला. श्री. उदय मेस्त्री गोवेरी यांनी न्याहारी दिली. श्री. नीलेश भाईप यांनी ध्वनीक्षेपक यंत्रणा विनामूल्य उपलब्ध करून दिली. चिन्मय ट्रेडर्स यांनी पाईप, श्री. प्रमोद चिंचोलकर, कोलगाव यांनी पत्रे, तर श्री. भास्कर मल्या यांनी चहा दिला. डॉ. सुर्यकांत बालम यांनी प्रसादाचे साहित्य दिले.
देवगड : श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालयाचे मालक श्रीरंग पाटणकर यांनी कार्यालय उपलब्ध करून दिल्याविषयी सद्गुरु सत्यवान कदम यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
कणकवली : मातोश्री मंगल कार्यालयाचे मालक श्री. भावेश कराळे यांनी मंगल कार्यालय विनामूल्य उपलब्ध करुन दिले. श्री. कराळे प्रतिवर्षी सभागृह देतात. कार्यक्रमाला उपस्थित श्री. दत्ताराम कराळे यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. पॉवरपॉइंटचे श्री. शिवराज म्हसकर आणि रामेश्वर बॅटरी वर्क्स यांनी बॅटर्या उपलब्ध करून दिल्या. पाळंदे कुरिअरचे श्री. मंदार मराठे यांनी त्यांची चारचाकी २ दिवस, तर फोंडाघाट येथील श्री. संजय नेरुरकर यांनी विद्युत जनित्र विनामूल्य उपलब्ध करून दिले. संजना टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स्चे संतोष काकडे यांनी प्रोजेक्टर आणि विद्युत जनित्र विनामूल्य दिले.
मालवण : मामा वरेरकर नाट्यगृह उपलब्ध करून दिल्याविषयी मालवण नगरपरिषद, नगराध्यक्ष, नगरसेवक आणि कर्मचारी यांचे आभार मानण्यात आले. काळबादेवी मंडप डेकोरेटर्सचे श्री. बाबू धुरी यांनी ध्वनीक्षेपक यंत्रणा दिली. स्वामी हॉटेलचे कु. ऋषीकेश पेणकर, अतिथी बांबू हॉटेलचे मालक श्री. संजय गावडे यांनी भोजनाची विनामूल्य सोय केली. जय अंबे स्वीट मार्ट, मालवणचे श्री. मधु चव्हाण, कुंभारमाठ यांनी अल्पाहार उपलब्ध करून दिला. अध्यापक विद्यालय, मालवणचे प्राचार्य हेमंत प्रभू यांनी प्रोजेक्टर उपलब्ध करून दिला. मालवण केबल नेटवर्कचे श्री. मुकेश बावकर यांनी गुरुपौर्णिमेच्या पूर्वी केबलवरून कार्यक्रमाची प्रसिद्धी केली.
सावंतवाडी : सिद्धिविनायक मंगल कार्यालय, माजगाव आणि दैवज्ञ गणपति मंदिर, सावंतवाडी यांनी आसंद्या आणि पटल उपलब्ध करून दिले. सावंतवाडी येथील सनातनचे हितचिंतक श्री. शंकर राऊळ आणि श्री. वासुदेव बांदेकर यांनी साधकांसाठी अल्पाहार उपलब्ध करून दिला.