असा प्रकार अन्य धर्मियांच्या देवतांचे किंवा संस्थापकांचे रूप घेऊन केला असता, तर भारतच नव्हे, तर संपूर्ण जगातून याचा हिंसक विरोध झाला असता; मात्र हिंदु सहिष्णु आणि त्यांच्यात धर्मप्रेम नसल्याने ते अशा गोष्टींकडे गंमत म्हणून पहातात. यातून देवतांचा अवमान होत आहे, हे त्यांच्या लक्षात येत नाही. हिंदूंना धर्मशिक्षण नाही, हेच याचे मूळ कारण आहे.
बेंगळूरू : येथील वाहतूक पोलिसांनी सुरक्षित वाहन चालवण्याचा संदेश देण्यासाठी श्री गणेशाचा वापर केला आहे. यापूर्वी बेंगळूरू पोलिसांनी यमदेवतेचा वापर केला होता. आताच्या घटनेत एक व्यक्ती श्री गणेशाचे रूप घेत रस्त्यावरील वाहन चालकांना सुरक्षित वाहन चालवण्याचा संदेश देत आहे, तसेच तो शिरस्त्राणही वाटत आहे. याची छायाचित्रे सामाजिक माध्यमातून प्रसारित होत आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात