भित्तीपत्रकाद्वारे भगवा आतंकवाद दाखवण्याचा प्रयत्न
गोरखपूर : आगामी हिंदी चित्रपट ‘जिला गोरखपूर’चे दिग्दर्शक विनोद तिवारी यांच्या विरोधात भाजपचे नेते आय.पी. सिंह यांनी पोलिसांत तक्रार केल्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ‘या चित्रपटातून जमावाकडून हत्या आणि भगवा आतंकवाद दाखवण्यात आल्याचा’ आरोप त्यांनी केला आहे.
१. आय.पी. सिंह यांनी ‘ट्विट’ करून सांगितले की, ‘या चित्रपटातून योगी आदित्यनाथ यांचीच नव्हे, तर संपूर्ण हिंदु संस्कृती आणि नाथ संप्रदाय यांची प्रतिमा मलिन करण्याचाच भाग आहे. जर विनोद तिवारी यांच्यात धाडस असेल, तर त्यांनी हा चित्रपट प्रदर्शित करून दाखवावा.’ सिंह यांनी ‘या चित्रपटांच्या निर्मात्यांना अर्थपुरवठा कोणी केला आहे, याचीही चौकशी झाली पाहिजे’, अशी मागणी केली आहे.
२. ‘जिला गोरखपूर’ चित्रपटाच्या भित्तीपत्रकामध्ये भगवा वेश परिधान केलेला पाठमोरा साधू दाखवण्यात आला आहे. तो उगवत्या सूर्याकडे पहात असून शेजारी वासरू दाखवण्यात आले आहे, तसेच या साधूने पाठीमागे एक हात ठेवला असून त्या हातात पिस्तूल दाखवण्यात आले आहे. या साधूचे व्यक्तीमत्व उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासारखे दिसत आहे. याचसमवेत यात गोरखपूर मंदिरही दाखवण्यात आले आहे.
‘जिला गोरखपूर’ चित्रपट बनवणे बंद करत आहे ! – विनोद तिवारी यांची घोषणा
विनोद तिवारी यांनी याविषयी प्रसिद्धीपत्रक प्रसारित करून म्हटले आहे की, माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा आणि सामाजिक द्वेष पसरवण्याचाही नाही. यामुळे मी देश आणि समाज यांच्या हितासाठी हा चित्रपट बनवणे बंद करत आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात