Menu Close

गुरुपौर्णिमेच्या वेळी मुसलमान विद्यार्थिनी शिक्षकांच्या चरणी नतमस्तक झाल्याच्या घटनेचा धर्मांधांकडून विरोध

नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांनी इस्लामी गोल टोपी घातली नाही, यावरून त्यांच्यावर टीका करणारे आता का बोलत नाहीत ? सर्वधर्मसमभाव नेहमी हिंदूंनीच दाखवायचा असतो का ? शिक्षकांच्या चरणी नतमस्तक होणे अयोग्य आहे का ? हिंदू असहिष्णु असल्याचा थयथयाट करणारे पुरोगामी आता गप्प का ?

त्रिशूर (केरळ) : येथील मुलींसाठीच्या सीएन्एन् उच्च माध्यमिक शाळेमध्ये गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करण्यात आला. यात काही मुसलमान विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. यापैकी काही विद्यार्थिनी शिक्षकांच्या चरणांवर नतमस्तक होत असल्याची छायाचित्रे सामाजिक माध्यमातून सर्वत्र प्रसारित झाली. यावरून इंडियन युनियन मुस्लिम लीगच्या विद्यार्थी संघटनेने याला आक्षेप घेतला आहे. या संघटनेने राज्याच्या शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहून या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

१. या संघटनेचे राज्य सरचिटणीस पी.के. फिरोज यांनी म्हटले की, दुसर्‍या धर्मावर श्रद्धा ठेवणार्‍या लोकांना अशा प्रथेमध्ये सहभागी होण्यासाठी बाध्य केले जाणे, हे व्यक्तीस्वातंत्र्याचे हनन आहे.

२. काँग्रेसचे आमदार व्ही.टी. बलराम यांनी फेसबूकवर म्हटले आहे की, शिक्षकांद्वारे दिले जाणारे शिक्षण विनामूल्य दिले जात नाही. त्यांना त्यासाठी वेतन दिले जाते. एका चांगल्या शिक्षकाचे कौतुक होणे चुकीचे नाही; मात्र चरणस्पर्श करणे आणि विद्यार्थ्यांना त्यांच्यासमोर नतमस्तक होणे, यावर प्रश्‍न उपस्थित करायला हवे.

३. १०० वर्षे जुन्या असणार्‍या या शाळेचे व्यवस्थापक ई. बालगोपालन म्हणाले की, विद्यार्थिनींना या कार्यक्रमात सहभागी होण्यास बाध्य करण्यात आल्याचा आरोप चुकीचा आहे. त्यांच्यावर कोणताही दबाव घालण्यात आला नाही.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *