१० टन गोमांस पोलिसांच्या कह्यात !
गो-तस्करांना मारल्याविषयी ओरड करणारे अशा घटनांच्या वेळी कुठे लपून बसतात ? गो-तस्करांना मारहाण करणारे वृत्त दिवसभर दाखवणार्या एकाही वाहिनीने हिंदुत्वनिष्ठांना पोलिसांनी मारल्याचे वृत्त एकदाही दिले नाही, हे लक्षात घ्या !
उल्हासनगर : नगर-कल्याण महामार्गावर शहाड येथे २९ जुलैला रात्री ११.३० च्या सुमारास कल्याणच्या दिशेने जाणारा अनुमाने १० टन गोमांसाने भरलेला टेम्पो बजरंग दलाच्या तरुणांच्या सतर्कतेमुळे उल्हासनगर पोलिसांनी कह्यात घेतला आहे. या वेळी श्री. अजय सिंह, श्री. संदीप त्रिपाठी, श्री. संजय तिवारी या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सक्रीय सहभाग घेतला. या कार्यकर्त्यांवरच पोलिसांनी रस्त्यावर पडलेल्या बांबूच्या साहाय्याने पोलीस निरीक्षक आहेर यांनी लाठीमार केला, असा आरोप या हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी केला आहे. यासंदर्भात आहेर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.
काही काळ कारवाईच्या प्रक्रियेत पोलिसांकडूनच गोंधळ निर्माण करण्यात आला आणि तक्रार (एफ्आयआर्) नोंद न करताच गोमांसाने भरलेला ट्रक दडपशाहीने अन्य ठिकाणी कारवाईच्या नावाखाली गर्दी पांगवून हालवण्यात आला.
काही वेळात स्थानिक नगरसेवक श्री. ओमी कलानी आणि त्यांचे कार्यकर्ते घटनास्थळी आले. त्यामुळे गोरक्षण करणार्या तरुणांवर लाठीमार करणारे पोलीस मात्र शांत झाले. (हिंदुत्वनिष्ठांना लाठीमार करणार्या पोलिसांवर कारवाई होण्यासाठी लोकप्रतिनिधींनी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांकडे याविषयी पाठपुरावा करावा, अशी हिंदूंची अपेक्षा आहे. असे केले, तरच हिंदुत्वनिष्ठांचे खच्चीकरण होणार नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
श्री. ओमी कलानी यांनी पोलिसांना सांगून ट्रक पुन्हा बोलवून पोलीस ठाण्यात नेला आणि पुढील कारवाईसाठी पोलिसांना विनंती केली.
या प्रकरणी धर्माभिमानी श्री. आशिष यादव यांच्या तक्रारीवरून धर्मांध ट्रकचालक तौफिक फकीर याला कह्यात घेण्यात आले आहे. त्याच्यावर भारतीय दंड विधान ५०४ महाराष्ट्र प्राणी संवर्धन कायदा ५ (क), ९ (अ) आणि महाराष्ट्र महापालिका अधिनियम ३३५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून त्याला पोलीस कोठडी दिली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात