मिरज : पाश्चात्त्यांनी अनेक शोध लावले असे समजले जाते. वास्तविक भारतात गुरु-शिष्य परंपरेमुळे अगाध ज्ञान होते आणि यामुळेच महर्षी आर्यभट्ट, सुश्रृत, तसेच अनेक ऋषी यांनी पाश्चिमात्त्यांना ज्ञातही नसलेले अनेक शोध लावले. धर्माधिष्ठित ज्ञानार्जन पद्धतीने पूर्वीची शिक्षणपद्धती समृद्ध होती. याउलट सध्याच्या मेकॉले शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना आवश्यक ते ज्ञान मिळत नाही, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. गौरी खिलारे यांनी केले. २७ जुलै या दिवशी कन्या महाविद्यालय मिरज येथे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी प्राचार्य श्री. झाडबुके उपस्थित होते. प्रस्तावना प्रा. (सौ.) शर्वरी कुलकर्णी यांनी केली. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. याचा लाभ ५०० हून अधिक विद्यार्थिनींनी घेतला. या वेळी महाविद्यालयातील शिक्षक, प्राध्यापक, तसेच अन्य कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
धर्माधिष्ठित ज्ञानार्जन पद्धतीमुळे पूर्वीची शिक्षणपद्धती समृद्ध होती : सौ. गौरी खिलारे
Tags : Hindu Janajagruti Samiti