मुंबई : मंदिरांचे व्यवस्थापन सुधारायचे असेल, तर ते मंदिर सरकारने कह्यात घ्यायलाच हवे असे नाही. प्रत्येकाच्या धार्मिक भावना असतात. भाविकांची श्रद्धा असते. आज अनेक देवस्थानांचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे चालू आहे. (असे आहे, तर सरकार मंदिरे कशासाठी कह्यात घेत आहे ? ज्या मंदिरांचे व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने चालू आहे, अशा व्यवस्थापनाच्या साहाय्याने अन्य मंदिरांचे व्यवस्थापन सुधारण्यासाठी सरकार प्रयत्न का करत नाही ? ‘यातून मंदिर सरकारीकरणाचा हेतू व्यवस्थापन सुधारणे हा नसून मंदिरातील धन स्वतःच्या अधिपत्याखाली आणण्याचा सरकारचा डाव आहे’, असे हिंदूंना वाटत असल्यास चूक ते काय ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) सध्या आणखी कोणतेही मंदिर कह्यात घेण्याचा सरकारचा विचार नाही, असे प्रतिपादन राज्याचे अर्थमंत्री आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
काही दिवसांपूर्वी हिंदु जनजागृती समितीच्या प्रतिनिधींनी भाजपचे आमदार राज पुरोहित यांची भेट घेतली होती. त्या वेळी पुरोहित यांनी ‘मुंबई येथील श्री मुंबादेवीचे मंदिर कह्यात घेण्यात येणार आहे’, असे विधान केले होते, तसेच
काँग्रेसचे आमदार हरिभाई राठोड यांनी ‘मराठवाड्यातील श्री पोहरादेवीचे मंदिर सरकारने कह्यात घ्यावे’, अशी मागणी नागपूर येथील पावसाळी अधिवेशनात श्री शनैश्चर मंदिराच्या सरकारीकरणाच्या विधेयकावरील चर्चेच्या वेळी विधान परिषदेत केली होती. या पार्श्वभूमीवर दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींनी ‘श्री शनैश्चर मंदिरानंतर अन्य कोणते मंदिर व्यवस्थापनासाठी कह्यात घेण्याचा सरकारचा विचार आहे का ?’, हा प्रश्न त्यांना विचारला असता त्यांनी वरील उत्तर दिले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
0 Comments