हिंदु संस्कृतीनुसार मृतदेहावर अग्नीसंस्कार केल्यावर जागेची अडचण येत नाही, तसेच आजाराचे विषाणूही नष्ट होतात ! त्याच प्रमाणे मृतदेहाचा वापर तांत्रिकांना आणि अनिष्ट शक्तींना करता येत नाही ! आज परिस्थितीमुळे हतबळ झालेल्या कम्युनिस्टांवर मृतदेह दहन करण्याची वेळ आली आहे ! हा त्यांचा वैचारिक पराभव आहे ! आता मृतदेह दहन करण्यामागील अध्यात्मशास्त्र समजून घेण्याची बुद्धी त्यांना होईल, तो सुदिन !
बीजिंग : चीनच्या जियांग्शी प्रांतामध्ये १ सप्टेंबरपासून मृतदेहांना पुरण्याऐवजी जाळण्यात येणार आहे. हा निर्णय जागेच्या अभावामुळे घेण्यात आला आहे. या नव्या नियमामुळे चिनी अधिकारी पूर्वी पुरण्यात आलेल्या कबरी तोडत आहेत. त्यामुळे अनेक गावांमध्ये लोकांचा विरोध होत आहे. यामुळे सरकारने अधिकार्यांना कठोर न होण्याचा आदेश दिला आहे. काही गावांमध्ये मृतदेहांना घरातच पुरण्याची परंपरा आहे. ‘यामुळे भाग्य उजळते’, अशी त्यांची श्रद्धा आहे.
१. चीनचे माजी राष्ट्रपिता माओ त्से तुंग यांनीही वर्ष १९५६ मध्ये मृतदेहांना जाळण्याचा सल्ला दिला होता; मात्र त्यांनी यावर कोणतेही धोरण ठरवले नव्हते. त्यांच्या निधनानंतर त्यांचा मृतदेहही पुरण्यात आला होता.
२. आता भूमीच्या कमतरतेमुळे पुरण्याऐवजी जाळणे किंवा समुद्रामध्ये सोडण्याचा निर्णय काही प्रातांकडून घेण्यात आला आहे.
३. जियांग्शी प्रांताच्या सरकारने लोकांना आवाहन केले आहे की, घरामध्ये पुरण्यात आलेले मृतदेह आम्हाला द्या आणि त्याच्या बदल्यात २० सहस्र रुपये घेऊन जा. आतापर्यंत २४ जागांमधून ५ सहस्र ८०० मृतदेह प्रशासनाकडे जमा करण्यात आले आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात