Menu Close

केरळमध्ये धर्मांध चोराकडून हिंदु तरुणीची गळा चिरून निर्घृण हत्या

साम्यवाद्यांच्या केरळमधील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे हे द्योतक आहे ! जमावाकडून मुसलमानांची हत्या झाल्यावर गळा काढणारे पुरोगामी आता कुठल्या बिळात लपले आहेत ?

पेराम्बवूर (केरळ) : वयस्कर महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी ओढून चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका धर्मांध मजुराने २० वर्षीय निमिषा थांबी नावाच्या महाविद्यालयीन हिंदु मुलीचा गळा चिरून हत्या केली.

पोलिसांनी सांगितले की, बंगालमधील मुर्शिदाबाद येथील रहिवासी बीजू हा एका खासगी उद्योगात नोकरी करतो. त्याने ३० जुलै या दिवशी सकाळी ९.४५ च्या सुमारास त्या तरुणीच्या घरात शिरून तिच्या आजीची सोन्याची साखळी चोरण्याचा प्रयत्न केला. आजीचे ओरडणे ऐकून निमिशा तिच्या संरक्षणासाठी धावली. बीजू याने निमिषाच्या  गळ्यावर चाकूने वार केला. तिचे रडणे ऐकून तिचे वडील आणि काका तिला वाचवण्यासाठी धावून आले; पण बीजूने त्यांच्यावरही आक्रमण केले. त्यात ते दोघेही घायाळ झाले. बीजू याने पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र लोकांनी त्याला कह्यात घेऊन पोलिसांना सुपूर्द केले. निमिषाला रुग्णालयात नेण्यात आल्यावर तिचा मृत्यू झाला.

केरळमधील पेराम्बवूरमधील ज्या भागात ही घटना घडली तेथे राज्याबाहेरील धर्मांध मजुरांची संख्या अधिक आहे. त्या ठिकाणापासून सुमारे १५ किमी अंतरावर असलेल्या ठिकाणी १८ एप्रिल २०१६ या दिवशी अमिरूल इस्लाम या आसाममधील एका धर्मांध कामगाराने एका हिंदु मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली होती. त्याला मृत्यूदंडाची शिक्षा झाली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *