Menu Close

आज ना उद्या श्री मुंबादेवी मंदिराचेही सरकारीकरण होणारच : आमदार राज पुरोहित

भाजप शासनाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार सांगतात की, ‘यापुढे आणखी कोणतेही मंदिर कह्यात घेण्याचा सरकारचा विचार नाही’ आणि त्याच पक्षाचे आमदार मात्र ‘मुंबादेवी मंदिराचे सरकारीकरण होणारच’, असे म्हणतात. हा हिंदूंमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न नाही का ?

मुंबई : श्री मुंबादेवीचे मंदिर हे कोळी समाजाचे मंदिर आहे. कोळी समाजाला त्यांचा हक्क मिळायला हवा. आज ना उद्या श्री मुंबादेवी मंदिराचेही सरकारीकरण होणारच, असे वक्तव्य विधीमंडळाचे भाजपचे मुख्य प्रतोद आमदार राज  पुरोहित यांनी केले. ३ ऑगस्ट या दिवशी मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघात आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये दैनिक सनातन प्रभातच्या प्रतिनिधीने ‘मुंबादेवीचे मंदिर कह्यात घेण्यासाठी आपण सरकारकडे प्रस्ताव दिला आहे का ? भविष्यात या मंदिराचे सरकारीकरण करण्याचा सरकारचा विचार आहे का ?’ असा प्रश्‍न आमदार पुरोहित यांना विचारला. त्यावर ‘या प्रश्‍नाचे उत्तर मी दुसर्‍या पत्रकार परिषदेत देईन’, असे बोलून त्यावर अधिक बोलणे त्यांनी टाळले.

मुख्य द्वार सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आले असल्याचे कारण देत मागील वर्षी श्री मुंबादेवीच्या दर्शनासाठी आलेल्या आमदार पुरोहित यांना सुरक्षारक्षकाने मागच्या प्रवेशद्वाराने जाण्यास सांगितले होते. त्या वेळी मंदिराचे पुजारी आणि आमदार राज पुरोहित यांच्यामध्ये वाद झाला होता. त्यानंतर वेळोवेळी आमदार राज पुरोहित यांनी मंदिरातील व्यवस्थापनावर ताशेरे ओढले आहेत. नुकतेच नागपूर येथे झालेल्या पावसाळी अधिवेशनाच्या वेळी आमदार पुरोहित यांनी मुंबादेवी मंदिराच्या ठिकाणी महिलांसाठी प्रसाधनगृह नसल्याची टीका केली होती. थोडक्यात आमदार राज पुरोहित आणि मुंबादेवी मंदिरातील व्यवस्थापन यांच्यातील वाद सर्वपरिचित आहे. (ठिकठिकाणच्या मंदिर व्यवस्थापनाविषयी भाविकांमध्ये असलेला असंतोष, सरकारीकरणानंतरही मंदिरांत होत असलेला धनाचा अपहार, मंदिराच्या धार्मिक गोष्टींमध्ये सरकारचा हस्तक्षेप हे सर्व पहाता भक्तांच्या हाती मंदिरांचे व्यवस्थापन सोपवणे आवश्यक ठरते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *