पाकमधील हिंदु समाजाचा छळ करण्यासाठी त्यांना अशा प्रकारे खोट्या प्रकरणात गोवले जाते ! भारतात प्रतिदिन धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमणे होतात, हिंदूंच्या मुलींना लव्ह जिहादमध्ये फसवले जाते; मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही !
कराची : पाकच्या सिंध प्रांतामध्ये १९ वर्षीय हिंदु तरुणाला सामाजिक माध्यमाद्वारे ईशनिंदा केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली. पाकमधील वर्तमानपत्र ‘डॉन’च्या वृत्तानुसार स्थानिक धर्मगुरु महंमद अनवर सुमरू यांनी केलेल्या तक्रारीवरून या तरुणाला अटक करण्यात आली आहे.
या तरुणाला किमान १० वर्षांची शिक्षा होऊ शकते. स्थानिक लोकांनी सांगितले की, या तरुणाच्या बहिणीने इस्लाम स्वीकारल्याने तो तणावग्रस्त होता.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात