भाजपच्या राज्यातील सरकारकडून हिंदूंपेक्षा मुसलमानांच्या हत्यांकडे अधिक लक्ष देण्यात आल्याची घटना भाजपचे खरे स्वरूप दर्शवते !
जयपूर : राजस्थानच्या अलवरमध्ये २० जुलै या दिवशी रकबर खान या गोतस्कराची जमावाकडून झालेल्या कथित हत्येमुळे देशात वादंग निर्माण झाला आहे. मात्र त्याच दिवशी राजस्थानच्या बारमेर येथे खेताराम भिल नावाच्या एका हिंदु मागासवर्गीय तरुणाला तो एका मुसलमान मुलीच्या प्रेमात पडला म्हणून मुसलमानांच्या जमावाने चिणून ठार केले, ही बातमी प्रसारित झाली नाही. या दोन्ही घटनांतील विरोधाभास येथेच संपत नसून त्याला इतर कंगोरेही आहेत.
१. रकबर याच्या हत्येप्रकरणी राज्यशासनाने न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत; मात्र खेताराम भिल याच्या हत्येच्या प्रकरणी मात्र अशी काही चौकशी शासन करत नाही.
२. रकबर याच्या कुटुंबाला सव्वा लक्ष रुपयांची भरपाई देण्यात आली; मात्र खेताराम भिल याच्या कुटुंबाला काहीच साहाय्य मिळाले नाही.
३. राजस्थानचे गृहमंत्री यांनी रकबर याच्या कुटुंबाला भेट दिली; मात्र खेताराम भिल याच्या कुटुंबाला शासनाच्या कोणत्याच प्रतिनिधीने भेट दिली नाही.
४. रकबर याच्या हत्येप्रकरणी खासगी दूरचित्रवाहिन्यांवरील निवेदक अरुंधती रॉय, बरखा दत्त आणि सर्व मुसलमानधार्जिणे पत्रकार अन् राजकीय नेते यांनी हिंदुविरोधी वक्तव्ये करून त्यांचा कंड शमवून घेतला; मात्र मात्र खेताराम भिल याच्या हत्येची बातमी अपवादानेच प्रसारमाध्यमांवर झळकली.
५. रकबर याच्या हत्येप्रकरणी ३ पोलिसांना निलंबित करण्यात आले आणि तिघांचे स्थानांतर करण्यात आले. तर खेताराम भिल याच्या हत्येची नोंदही घेण्यात आली नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात